शेतकऱ्यांना लाल मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:46 PM2018-11-26T23:46:20+5:302018-11-26T23:46:44+5:30

आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे.

Farmers saved by red chillies | शेतकऱ्यांना लाल मिरचीने तारले

शेतकऱ्यांना लाल मिरचीने तारले

Next

रवींद्र लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : काही तरी वेगळे करुन दाखविण्याच्या तुमच्यात धमक असेल, आणि त्याला कष्टाची जोड दिल्यास तुम्हाला कोणत्याची क्षेत्रात यश नक्की मिळते. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे. भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील संदीप काटोले या तरुण शेतक-याने ही किमया करुन दाखविल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
मिरचीचे आगार म्हणून पारध परिसराची ओळख आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. तर काही शेतक-यांनी उपलब्ध पाण्यावर मिरची पीक जगविण्याची धडपड केली. मात्र अनेकांच्या हाती निराशा आली. मात्र याला अपवाद ठरले युवा शेतकरी संदीप काटोले. आपल्या शेतात पाणी नसल्याने काटोले यांनी इतर शेतक-यांची बारा एकर जमीन बटाईने केली. त्या शेतीत मिरची लागवड करुन आतापर्यंत त्या मिरचीतून ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे या शेतक-याने इतर शेतक-यांसमोर एक वेगळा आदर्श उभा केला असल्याने परिसरातील शेतकरी काटोले यांचे कौतुक करु लागले आहेत. काटोले यांच्याकडे पंधरा एकर शेती आहे. त्यांनी तीन एकरात आपल्या भावाच्या मदतीने टरबूज तर तीन एकरांत वांग्याची लागवड केली आहे. पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत कमी खर्चात जास्त उत्पादन निघावे म्हणून काटोले यांनी निंबोळा येथील शेतकरी अनिल देशपांडे यांची बारा एकर शेत जमीन बटाईने केली. या शेतीत जून महिन्यातच बारा एकरात सव्वा लाख मिरचीच्या रोपाची ठिंबकद्वारे लागवड केली. लागवडीपासून ते आतापर्यंत साडे नऊ लाख रुपये खर्च झाला असल्याचे या शेतक-याने सांगितले आहे. दरम्यान, लाल मिरचीतून काही तरी हाती पडेल यासाठी त्यांनी दीड महिन्यापासून मिरची न तोडता ती झाडावरच लाल होऊ दिली. गेल्या तीन दिवसांपूर्वी ती तोडली असता तब्बल सहाशे क्विंटल मिरची निघाली. सध्या लाल मिरचीला नागपूर, मध्य प्रदेश, पुणे, नगर, नंदुरबार इ. बाजारपेठेत दहा ते बारा हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

Web Title: Farmers saved by red chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.