शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

जिथे संशोधन झाले त्या मातीत पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 20:06 IST

बदनापूर येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मोसंबी संशोधन केंद्र कार्यरत आहे.

- संतोष सारडाबदनापूर : बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रात तूर, मूग, हरभरा या बियाण्यांच्या विविध जातींचे संशोधन झालेले असून हे बियाणे बदनापूरसह तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात मिळत नसल्यामुळे येथील संशोधनाचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.

बदनापूर येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मोसंबी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या संशोधन केंद्रातील संशोधकांनी अपार मेहनतीने अनेक बियाण्यांच्या जातीचे संशोधन शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न वाढावे याकरिता दिलेले आहे. हे संशोधन राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध झालेले आहेत. याचा उपयोग राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी घेत आहेत. या सर्व संशोधित केलेल्या वाणांच्या बियाण्याचे उत्पादन कृषी विद्यापीठामार्फत केले जाते. उत्पादित केलेले बियाणे परभणी, छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येते. परंतु, बदनापूर येथे संशोधन झालेले हे बियाणे बदनापूर परिसरातील शेतकऱ्यांकरिता विक्री करण्यात येत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना या संशोधित वाणांचा आपल्या शेतात उपयोग घेता येत नाही.

यातील अनेक संशोधित वाण विविध रोगांना बळी पडत नाही तसेच कमी पाण्यात येतात. उत्पन्नही मुबलक मिळते अशा वैशिष्ट्यपूर्ण बियाण्याला मात्र कृषी विद्यापीठाच्या ध्येय धोरणामुळे शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. हे बियाणे या भागातील शेतकऱ्यांना खरिपात मिळाले नसले तरी, रब्बी हंगामात मोती ज्वारी व हरभऱ्यासारखे बियाणे शेतकऱ्यांना पेरणीला उपयोगी पडू शकतात. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी संशोधित बियाणे या भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

विक्री केंद्र नाहीयेथे संशोधित झालेले बियाणे काही खासगी कंपन्या या बियाण्याची जात व वाणाचा नंबर छापून विकतात. परंतु, शेतकऱ्यांचा विश्वास कृषी संशोधन केंद्रावर जास्त असल्यामुळे बरेच शेतकरी येथील बियाण्याची या केंद्रात विचारणा करीत असतात. परंतु, येथे विक्री केंद्र नसल्यामुळे बियाण्यांची विक्री होत नाही.

संशोधित झालेले बियाणेया सर्व संस्थांना प्रत्येकी शंभर ते दीडशे एकरपर्यंत जमीन दिलेली आहे. यापैकी कृषी संशोधन केंद्रामध्ये तूर बीडीएन १, बीडीएन २, बीडीएन ७०८, बीडीएन ७११, बीडीएन ७१६, बीएसएमआर १७५, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, गोदावरी, रेणुका या तुरीच्या जाती संशोधित केलेल्या आहे. तसेच मुगाच्या बीएम ४, बीएम २००२- १, बीएम २००३- २, वन बीटीएमआर १४५ या मुगाच्या जातीचे संशोधन झालेले आहे. हरभऱ्याचे बीडीजे ९३, बीडीएनजे ७९७, बीडीएनजे ७९८, परभणी १६ या हरभऱ्याच्या जातीचे संशोधन झालेले आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रFarmerशेतकरीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ