शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बँकेकडून तगादा, शेतकऱ्याने संपवले जीवन; ८ तास मृतदेह पोलिस ठाण्यात, मॅनेजरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:18 IST

शेतकरी आत्महत्याप्रकरणी करंजळा येथील बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

गोंदी (जि. जालना) : अंबड तालुक्यातील करंजळा येथील येथील शेतकरी कृष्णा विनायक आमटे (४०,रा. करंजळा, ता. अंबड) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान उघड झाली होती. एसबीआय बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. नातेवाइकांनी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गोंदी पोलिसांकडे केली होती. तब्बल आठ तास मृतदेह गोंदी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्यानंतर यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या महाकाळा येथील शाखा व्यवस्थापक गोविंद शिंदे तसेच वैभव दहीवाळ यांच्यावर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा आमटे हे शनिवारी रात्री जेवण करून झोपले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते कोणाला काहीही न सांगता त्यांच्या शेतात गेले होते. बराच वेळ झाल्यानंतर ते परत आले नसल्याने त्यांचे नातेवाईक शेतात गेल्यानंतर त्यांना कृष्णा आमटे हे लिंबाच्या झाडाला मफलरच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना जालना येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मात्र, नातेवाइकांनी अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट गोंदी पोलिस ठाण्यात आणून बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास विनायक आमटे यांच्या फिर्यादीवरून एसबीआय बँकेचे व्यवस्थापक गोविंद शिंदे व वैभव दहीवाळ यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जासाठी तगादा लावल्याचा आरोपकृष्णा आमटे यांनी स्टेट बँक इंडियाच्या महाकाळा शाखेतून काही महिन्यांपूर्वी घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. कर्ज असल्याने त्याचे बँकेत जाणे-येणे होते. शनिवारी सकाळी कृष्णा आमटे हे एसबीआयच्या महाकाळा येथील शाखेत गेले होते. यावेळी बँकेचे पैसे नजर चुकीने कृष्णा आमटे यांच्याकडे आले होते. बँक मॅनेजर व एका व्यक्तीने धमकावल्याचा आरोप कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास आमटे यांनी गोंदी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. कर्ज आताच भरा असा तगादा लावल्यामुळे मानसिक तणावातून कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या