शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात घातक शस्त्रसाठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:59 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोकुळवाडी मार्गावरील हरिगोविंदनगर येथील एका घरावर छापा मारुन तीन धारदार तलवारी, एक खंजीर, एक गुप्ती, एक कुकरी, एक चाकू, सत्तूर असा मोठा शस्त्राचा साठा जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील गोकुळवाडी मार्गावरील हरिगोविंदनगर येथील एका घरावर छापा मारुन तीन धारदार तलवारी, एक खंजीर, एक गुप्ती, एक कुकरी, एक चाकू, सत्तूर असा मोठा शस्त्राचा साठा जप्त केला. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याची शहरातील पहिलीच घटना आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडाच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना हरीगोविंदनगर येथील अजय श्रीसुंदर (२७) याने अवैधपणे धारदार घातक शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती.गुन्हे शाखेच्या पथकाने याची पडताळणी केल्यानंतर श्रीसुंदर याच्या घरावर छापा मारला घरात ठिक ठिकाणी लपवून ठेवलेल्या तीन तलवारी, रेम्बो खंजीर, सत्तूर, गुप्ती, अनेक चाकू असा धारदार शस्त्रांचा साठा जप्त करुन श्रीसुंदर याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, सहायक पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जससिंग परदेशी, ज्ञानेश्वर सानप, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर आदींनी कारवाई यशस्वी केली.पिस्तूल पकडण्यासाठी गेले अन...गोविंदनगर येथील अजय श्रीसुंदर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. पिस्तूल पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला घराची झडती घेत असताना शस्त्रांचा इतका मोठा साठा सापडला.गोपाल शर्मा याच्या हत्येमध्ये आरोपीपकडलेला अजय श्रीसुंदर याला शहरात २०१२- १३ मध्ये झालेल्या गोपाल शर्मा खून प्रकरणात अजय श्रीसुंदर याला पोलिसांनी अटक केली होती. काही महिने हर्सूल कारागृहात त्याने शिक्षा भोगली आहे. जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे जिल्ह्यासह इतर जिल्हयात काही गुन्हेगारी कृत्य केल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसArrestअटक