शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

जालन्यात बनावट बियाणांचा कारखाना उदध्वस्त; पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:34 IST

बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उदध्वस्त केला.

ठळक मुद्देकारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना : बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उदध्वस्त केला. कारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती गुरुवारी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग सुरुवातीलपासून बनावट बियाणे विक्री होवू नये यासाठी आवश्यक खरबदारी घेत आहे. जालना शहरातील कचेरीरोड भागात बनावट बियाणे विक्री व पॅकिंग होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या आधारे कृषी व पोलीस विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा कचेरीरोड भागातील संशयित कल्पेश शांतिलाल टापर याच्या राहत्या घरी छापा टाकला. या ठिकाणी आरआरबीटी कपाशी बियाण्याचे पाकिटे, खुले बियाणे, तसेच भेंडी, मिरची, टरबूज, भोपळा, वांगे, कांदा या भाजीपाला पिकांचे पॅकिंग व खुल्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे आढळून आले. येथे बियाणांवर रासायनिक प्रक्रिया व रंग देवून नामांकित कंपनीचे लेबल्स वापरून खरे वाटतील, असे बियाणे तयार केले जात होते. तीनशे ते चारशे रुपयांच्या पाकिटावर हजार रुपयांपर्यंत बनावट किंमतही टाकली जात होती. पथकाने सर्व बियाणे, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त केली. चौकशीत टापर याने बाबासाहेब प्रल्हाद वाडेकर (रा. जामवाडी), हरिदास बाजीराव निहाळ (रा.चनेगाव) यांना बनावट बियाणे विक्री केल्याचे सांगितले. पथकाने दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत घरातील बनावट आरबीटी कपाशी बियाण्याचा साठा जप्त केला. कारवाईत पथकाने एकूण ६४ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिघा संशयितांवर  कदीम जालना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र बियाणे अधिनियम, अत्यावयाक वस्तू  व सेवा कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना गुरुवारी सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना  २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कारवाईत यांचा सहभागपोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, जिल्हा गुणनियंत्रक सायप्पा गरांडे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कमलाकर अंभोरे, सुरेश गिते, भालचंद्र गिरी, तुकाराम राठोड, सॅम्युअल कांबळे, फुलसिंग घुसिंगे, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, समाधान तेलंग्रे, मदन बहुरे, रंजित वैराळ, सोमनाथ उबाळे, किशोर जाधव, योगेश जगताप, पठाण, कृषी विभागाचे एस.व्ही. कराड, पी.स. कदम, आर. एल. तांगडे, आर.जे. बोडके यांनी ही कारवाई केली.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता तिघा संशयितांनी हे बियाणे कुणाकडून खरेदी केले, यात कुठल्या कंपनीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात आणखी काही एजंटमार्फत अशा बनावट बियाण्याची विक्री होते का याचाही शोध घेण्यात येत आहे. बनावट बियाणांचे नुमने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, यात पर्यावरणास हानिकारक घटक आढळल्यास संशयितांवर पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल, असे जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीPoliceपोलिस