शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकावे, हा सर्वांचा नाश करतोय!'; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:47 IST

'जीआरमध्ये हेराफेरी करू नका,' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा.

- पवन पवारजालना: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरला विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. अंकुशनगर महाकाळा येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत थेट हल्लाबोल करत 'तू सरकारचा बाप झालास का?' असा सवाल केला. तसेच, मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कोणत्याही प्रकारची हेराफेरी झाल्यास सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

'हा जीआर खूप महत्त्वाचा'जरांगे म्हणाले की, "भुजबळ यांनी जीआरविरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे, मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिले आहे, याचा अर्थच हा जीआर किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध होते. ज्यांना काहीच अक्कल नाही, तेच या जीआरचा विरोध करत आहेत. हा जीआर ४०-५० वर्षांनी निघाला आहे, हे आरक्षण इतके सोपे असते तर मराठा समाजाचे कल्याण कधीच झाले असते."

'परस्पर जीआर काढला नाही, कॅबिनेटने काढला आहे'भुजबळ यांनी 'हा जीआर परस्पर काढला' असा आरोप केला होता, त्याला जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिले. "हा जीआर परस्पर कसा काढतील? तो कॅबिनेटने काढला आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला आहे. तुला एकट्यालाच अक्कल आहे का? तू दीड छटाक पुस्तक वाचले म्हणजे लय शहाणा झाला का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांना अक्कल नाही का? तू काय घटना समितीचा अध्यक्ष आहे का? तू राष्ट्रपती आहे का?" अशा शब्दांत जरांगे यांनी भुजबळांवर वैयक्तिक टीका केली.

'फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकावे'जरांगे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, "हा एकटा सरकारला वेठीस धरतोय, म्हणजे हा काय सरकारचा मालक झाला का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला जेलमध्ये टाकले पाहिजे, त्याला बाहेर ठेवू नये. हा एकटा माणूस सरकारला आणि ओबीसी-मराठ्यांचा नाश करत आहे."

'जीआरमध्ये हेराफेरी करू नका, अन्यथा...'यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. "आमच्या जीआरमध्ये अजिबात हेराफेरी करायची नाही आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची. जर हेराफेरी केली तर मी पण रस्त्याने फिरू देणार नाही सरकारला. त्यानंतर पुन्हा विदर्भासारखी परिस्थिती झाली असे म्हणू नका." त्यामुळे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील