शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राणी उंचेगाव येथे स्फोटकांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:30 IST

राणी उंचेगाव येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये विहीर ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाºया जिलेटीन स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात विविध ठिकाणी चेक पोस्ट माध्यमातून येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे काम सध्या तालुक्यात सर्वत्र चालू असतानाच राणी उंचेगाव येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये विहीर ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणाºया जिलेटीन स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिसांत चार जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील राणी उंचेगाव येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्टवर बैठे पथक नेमण्यात आले होते. त्यातील पथक प्रमुख नरेंद्र नागलवाड यांच्या पथकाने करड्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रमांक एम. ४ 0 ४ बी.डल्ब्यू-६८४६ या गाडीची तपासणी केली असता त्यात ही स्फोटके आढळून आली. एकूण आठ बॉक्स प्रत्येकी २५ किलो ग्रॅम प्रमाणे एकुण २०० किलो ग्रॅम स्फोटकांचा मोठा साठा असा एकूण पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. गौरव अशोक कुमार नानावटी (३१, रा.अमित हॉटेल जवाहर बाग पोलीस चौकीच्या पाठीमागे, नवीन जालना) हा त्याचे वडील अशोक कुमार नानावटी यांच्या नावे असलेल्या मॅगझिन हाऊसमधून आणून तो घनसावंगी तालुक्यातील बोडखा या गावी चंद्रकांत दत्तात्रय सपकाळ (रा.चिंचोडी पाटी जि. नगर) यांच्या विहिरीच्या खोदकामसाठी घेऊन जाताना आढळून आला. तेव्हा त्याच्या सोबत त्याचा नोकर उमेश रमेश खरात (२५ रा.खांडसरी नवीन जालना) हा देखील होता. नमूद लोकांकडे पथकाने संबंधित स्फोटकाच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता, त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची परवानगी किंवा लायसन्स नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अंबड पोलिसांत पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्यातील आरोपी गौरव अशोक कुमार नानावटी आणि उमेश रमेश खरात यांना सोमवारी अंबड पोलिसांनी अंबड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस