शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अतिरिक्त दाब; जलवाहिनी पुन्हा निखळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:17 IST

जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली.

ठळक मुद्दे१० दिवसांपासून निर्जळी : आता जुन्या जालन्याला टँकरने पाणी

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे पैठण जवळ निखळली होती. याची दुरूस्ती केल्यानंतर ही जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पुन्हा निखळली. याचा परिणाम जुन्या जालन्यातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. १० दिवसांपासून जुना जालन्यात पाणी न आल्याने नागरिकांचे मोठे हाल सुरू आहेत. यावर उपाय म्हणून आता पालिका प्रशासनाने नवीन जालन्यातील जलशुध्दीकरण केंद्रातून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.जुना जालना भागाला पैठण येथील जायकवाडी योजनेतून सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. तर सध्या नवीन जालना विभागाला घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरविले जात आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात पैठण ते जालना या दरम्यानची जलवाहिनी पाचोड जवळ रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असतांना पोकलनेचा धक्का लागून निखळली होती. पालिकेने शर्थीचे प्रयत्न करून ती जलवाहिनी दुरूस्त केली. परंतु, दुरूस्तीनंतरही पाण्याचा अतिरिक्त दाब ही जलवाहिनी सहन करू न शकल्याने ती निखळली. यापूर्वी दोनवेळेस त्यावर सिमेंटचे अस्तरिकरण केले. परंतु, याचाही उपयोग झाला नाही.सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पैठण येथील जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु, चिंचखेड परिसरातील जलकुंभात हे पाणी पोहचल्यावर त्याच्या परतीचा दाब दुरूस्त केलेल्या जलवाहिनीवर आल्याने ती जलवाहिनी पुन्हा निखळून त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. ही निखळलेली जलवाहिनी नव्याने दुरूस्तीचे काम मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आले. परंतु, ते आणखी दोन दिवस सुरू राहणार असल्याने जुना जालन्यातील पाणीपुरवठा पुन्हा लांबणीवर पडणार आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदwater transportजलवाहतूक