शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:52 IST

आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नुकताच देशभरात लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक दिसून आल्याचा आरोप करीत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव..’चा नारा देण्यात आला.लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक दिसून आला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी करून ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी घंटानाद आंदोलन केले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव... देश बचाव’ असा नाराही देण्यात आला. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.ईव्हीएम मशिनद्वारे मतदानात होत असलेल्या मताची मोठी अफरा-तफर थांबवावी, तसेच ईव्हीएममुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या होणाºया प्रकाराची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात झालेल्या सर्व ४८ लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये परत निवडणुका घेऊन आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक डोके, डॉ. शरदचंद्र वानखेडे, डॉ. प्रवीण कनकुटे, दीपक बोराडे, माजेदभाई, विजय लहाने, राजीव दळे, बाळासाहेब रत्नपारखे, मैनाबाई खंडागळे, मीना वाहुळे, विनोद दांडगे, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, संतोष आढाव, राहुल भालेराव, राजेंद्र खरात, विष्णू खरात, दीपक घोरपडे, ज्ञानेश्वर जाधव, सर्जेराव मगरे, सुरेश उघडे, विलास नरवडे, गौतम वाघमारे, शेख हनीफ, लक्ष्मण राठोड, सुभाष आधुडे, सिद्धार्थ कनकुटे, सूरज सोनवणे आदींची उपस्थिती होती.बदनापूर येथेही तहसीलदारांना निवेदनबदनापूरमध्येही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ईव्हीएम ऐवजी पुन्हा जुन्याच पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली.यावेळी संतोष शेळके, रविराज वाहुळे, प्रकाश मगरे, राहुल तुपे, हरीश बोर्डे, प्रकाश खरात, अरुण हिवराळे, दगडू पवार, शैलेंद्र मिसाळ, सुरेंद्र तुपे, गणेश बोर्डे, अक्षय रगडे, भारत रगडे, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.भोकरदनमध्येही ‘वंचित’कडून विरोधभोकरदन येथील भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMorchaमोर्चाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीagitationआंदोलन