शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी जातायत तरी आत्मपरीक्षण नाही; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:50 IST

शिवसेना मालक, नोकराचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष

जालना : तुमच्या कर्माने सरकार पडले. किती आरोप करणार? दगाबाज कोण? बेईमान कोण? हे जनतेने ठरविले. म्हणून तुम्ही ५६वरून २०वर आलात, तरीसुद्धा आत्मपरीक्षण नाही. भास्कर अंबेकर यांच्यासारखे पदाधिकारी शिवसेनेसोबत का जातायत ? याचा विचार करा. हा पक्ष मालक आणि नोकरांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान इथे केला जातो, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

जालना येथे बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आ. अर्जुन खोतकर, आ. हिकमत उढाण, पंडित भुतेकर, भास्कर अंबेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे म्हणाले, खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नाही, तरीही मी छोटी-मोठी ऑपरेशन बरोबर करतो. राज्यात सरकार नावाचा प्रकार राहिला नव्हता. विकासकामे थांबली होती. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचे काम केले म्हणून उठाव करावा लागला. विधानसभेत ८० पैकी ६० जागा जिंकल्या. आम्हाला शिव्या देणाऱ्यांनी ११० जागा लढवून २० जागा जिंकल्या. तुम्ही आरोप करीत राहा, मी कामातून उत्तर देत राहीन. शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदत केली. सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले. खात्यात पैसे जमा होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करताना अनेकांनी आरोप केले, आजही करतायत. परंतु, ती योजना बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.

खुर्ची, सत्ता आमचा अजेंडा नाहीसोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी जनतेला सोन्याचे दिवस आणायचे आहेत. आमचा अजेंडा खुर्ची, सत्ता नाही, आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसविले त्यांचे प्रश्न सोडविणे हा आहे. पदे येतात - जातात, सत्ता येते - जाते. नाव गेले की परत येत नाही. तेच नाव जपले पाहिजे. बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार जपले पाहिजेत. मी आज कार्यकर्ता म्हणून काम करीत असून, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सर्वांत मोठी आहे, असेही शिंदे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Slams Thackeray: No Introspection Despite Leaders Leaving!

Web Summary : Shinde criticized Thackeray, stating his actions caused the government's fall. He questioned why leaders are leaving Shiv Sena, emphasizing his government's commitment to development and farmer support, dismissing claims about welfare schemes.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेJalanaजालना