शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही...'; पराभवानंतर राजेश टोपेंनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:00 IST

माजी मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर सुरेश भटांची गझल पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

अंबड : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या पंचवार्षिकमध्ये काटे की टक्कर झाली. अत्यंत चुरशीचे झालेल्या लढाईत विद्यमान आमदार माजी मंत्री राजेश टोपे यांचा निसटता पराभव झाला. परंतु, त्यांचा हा पराभव त्यांच्या समर्थकांना धक्कादायक असा होता. सर्वजण या निकालाकडे आश्चर्यकारकपणे पाहत आहेत. खुद्द राजेश टोपेदेखील या पराभवामुळे व्यथित झाले आहेत. एका ध्वनी संदेशाद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगूज साधले आहे. पुन्हा नव्या उमेदीने चुका सुधारून पुढे जाऊ. कार्यकर्त्यांनी संयम राखून भावनिक न होता हिमतीने आलेल्या परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन केले आहे. आपण नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेलो आहे हे त्यांनी नमूद केले.

माजी मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर सुरेश भटांची गझल पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दुर्दम्य आशावाद व्यक्त करणाऱ्या या काव्यपंक्तीतून नव्या उमेदीने, उत्साहाने, सामर्थ्याने उभे राहू हा आशावाद व्यक्त केला आहे. पदोपदी विरोधकांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण या अडथळ्यांवर मात करून पुढे जाऊ असे सूचित केले आहे. राजकीय आयुष्यात असे चढउतार येतच असतात ही जाणीव या निमित्ताने या काव्यपंक्तीच्या माध्यमातून टोपे यांनी व्यक्त केली आहे.

अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाहीराजेश टोपे यांनी कवी सुरेश भट यांची कविता समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिऊन अडखळणे, पावलांना पसंत नाही.. ही कविता राजेश टोपे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकghansawangi-acघनसावंगीRajesh Topeराजेश टोपे