शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही आन्वा येथे पाणीटंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:37 IST

पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे नायब तहसीलदार तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी पाहणी केली होती. मात्र असे असताना आता आठवडा उलटला आहे. तरी देखील पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.आन्वा हे भोकरदन तालुक्यातील एक मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या १२ हजार एवढी आहे. या गावात गेल्या दहा ते १२ वर्षापासून पाणीपुरवठ्याची ओरड कायम असल्याचे ग्रामस्थांनी सािंगतले. आता किमान या गावात लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. असे असताना याकडे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवडभरापूर्वी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी आन्वा येथे भेट देऊन जलस्त्रोतांची पाहणी केली होती. विहिरींनी तळ गाठला असून, आजूबाजूला पाण्याचा कुठलाच खात्रीशीर पर्याय नसल्याने चार टँकर सुरू केल्याशिवाय गावाची तहान भागणार नाही अशी मागणी यावेळी आन्वाचे सरपंच मदन कुलवाल यांनी केली आहे.या संदर्भात ग्रामविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती सरपंच कुलवाल आणि उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी दिली. एकूणच एवढी गंभीर स्थिती असताना प्रशासन कुठल्या आधारावर टँकर सुरू करण्यास मान्यता देत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ