शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमर रहे..च्या घोषणांनी परिसर झाला भावनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:18 IST

जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे औरंगाबाद मार्गावर त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नागरिकांनी दिलेल्या अमर रहे, अमर रहे, विर जवान अमर रहे च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.बुलडाणा जिल्ह्यातील जवान नितीन शिवाजी राठोड हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी विमानाने औरंगाबादेत आणण्यात आले. त्यानंतर एका वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेताना, त्यांना सलामी देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी औरंगाबाद मार्गावर गर्दी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'पाकिस्तान मुदार्बाद, 'अमर रहे' , 'अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सलामी दिल्यावर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.याप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, काँग्रेसचे शहाराध्यक्ष शेख महेमूद, गणेश राऊत यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.श्रध्दांजलीसाठी अनेकांची उपस्थितीशहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव जालना शहरात येणार असल्याची बातमी शहरात पसरली. त्यानंतर प्रत्येकाने औरंगाबाद चौफुलीकडे धाव घेत शहीद जवान राठोड यांना श्रध्दांजली दिली.अन प्रत्येकजण झाला भावूकशहीद जवान राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करतावेळेस उपस्थित नागरिक भावूक झाले होते. यातील काही जणांच्या डोळ््यात तर अश्रू तरळले होते.पार्थिव येताच भारत माता की जयच्या घोषणाशहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद चौफुली येथे येताच उपस्थितांनी भारत माता की जयच्या दिल्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नागरिकांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :MartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्लाSocialसामाजिक