शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक; ९८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:28 IST

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतदानाचा दिवस मतदारांसाठी गोड ठरला. मागील अठरा दिवसांपासून काहीही हाती न लागलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी हाती फूल नाहीतर फुलाची ‘पाकळी’ पडली. निवडणुकीसाठी ९८.४८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले.

ठळक मुद्दे१० मतदारांची गैरहजेरी : ६५७ पैकी ६४७ मतदारांनी केले मतदान

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतदानाचा दिवस मतदारांसाठी गोड ठरला. मागील अठरा दिवसांपासून काहीही हाती न लागलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी हाती फूल नाहीतर फुलाची ‘पाकळी’ पडली. निवडणुकीसाठी ९८.४८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. ६५७ पैकी ६४७ मतदारांनी मतदान केले. १० मतदार गैरहजर राहिले. त्यामध्ये जालन्यामधील ७ आणि औरंगाबाद, सिल्लोड व पैठण येथील प्रत्येकी १ मतदारांचा समावेश आहे. ३२१ पुरुष आणि ३२६ महिला मतदारांनी निवडणुकीत मतदान केले.शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांच्यात थेट आमने-सामने लढत झाल्याचे स्पष्ट आहे. बहुमतामुळे महायुतीचे पारडे जड होते. तरीही इतर पक्षातील मतदान फोडण्यासाठी युतीने प्रचंड मेहनत घेतली. कारण भाजपवर शिवसेनेला मतदान होईपर्यंत भरवसा नव्हता. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणामुळे भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या मध्यस्थीने भाजपचा भरवसा जिंकण्यात शिवसेनेला यश आले. त्याचे परिणाम सोमवारी झालेल्या मतदानावर दिसून आले. आघाडीची काही मते फुटतील, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला.महापौरांनी केले पहिले मतदानऔरंगाबाद जिल्ह्यातील पहिले मतदान महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र होते. त्यानंतर माजी महापौर विकास जैन, त्र्यंबक तुपे यांनी मतदान केले. नगरसेवक सिद्धांत शिरसाट हे रुग्णालयातून मतदानासाठी आले. तीन मतदारांना मदतनीस देण्यात आले. यामध्ये मोहन मेघावाले, बन्सी जाधव व अन्य एकाचा समावेश होता. जि. प. गट सदस्याच्या ओळखपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानासाठी थांबविण्यात आले. स्वाक्षरी आणल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. औरंगाबाद तहसीलमध्ये सर्वाधिक १३८ मतदान होते. तेथे १०० टक्के मतदान झाले. दरम्यान, मतमोजणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.औरंगाबादेत ३८२ तर जालन्यात २६५ जणांचे मतदानया निवडणुकीसाठी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील तहसील कार्यालयात १७ मतदान केंद्रे होती. जालना जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयातील मतदान केंद्रांवर एकूण २७२ पैकी २६५ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.तेथील काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी मतदानाला दांडी मारली. औरंगाबादमध्ये ३८५ पैकी ३८२ मतदारांनी मतदान केले.२२ आॅगस्ट रोजी होणार मतमोजणीचिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. विजयासाठी एकूण मतदानाच्या ५० टक्के मते अधिक १ असे सूत्र असणार आहे. पहिल्या पसंतीची किमान ३२४ मते घेणारा उमेदवार विजयी होईल. महायुतीकडून दानवे, आघाडीकडून कुलकर्णी आणि एक अपक्ष, असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :JalanaजालनाElectionनिवडणूक