जालना : भीम आर्मी (भारत एकता मिशन)च्या वतीने १४ मे रोजी ईद-ए-मिलादचा कार्यक्रम जालना येथील वलीमामु दर्गा येथे साजरा करण्यात आला.
अॅड. भाई चंद्रशेखर आझाद यांच्या निर्देशानुसार भीम आर्मीतर्फे वलीमामु दर्गा येथे ईद-ए- मिलाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर, भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष प्रा. हर्षकुमार गायकवाड, अस्लमभाई, बागवान आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रदेश संघटक रंजित माने यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम. यू. पठाण, सुनील पाडमुख, आशोक झिने, रवी ढाकणे, आशोक पाडमुख, राहुल पाडमुख, मोरे पाटील, परमेश्वर मोरे, सखाराम मोरे, संतोष पाडमुख, सुनील पाडमुख आदींनी परिश्रम घेतले. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.