शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:37 IST

बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : आपण आई-वडील होत आहोत. पण, पालक होत नाही. पालक होणे फार महत्त्वाचे आहे. बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.येथील पंडित गोविंदराव जळगांवकर नाट्यगृहात आयोजीत यशवंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावी फाउंडेशन, अकलूज च्या अध्यक्षा सविता व्होरा होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली खरात, अनुराधा राख, कृषीभुषण विजयअण्णा बोराडे, जीएसटी उपायुक्त प्रशांत गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत ‘कृषिउद्योग आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर पवार बोलत होत्या.दरम्यान सुनंदा पवार यांनी महिलांनी आपल्या जवाबदाऱ्या संभाळत असताना तरुण मुला- मुलींकडे कसे लक्ष दिले पाहिजे याचाही सल्ला दिला. त्या म्हणाल्या, आजची स्त्री का जिजाऊ होऊ शकत नाही. मुलांचा मुलींचा होणारा बदल हा फार घातक असून वेळेवरच याला अवर घातला नाही तर आपल्या हातात फक्त पश्चाताप शिवाय काहीच रहाणार नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्रिला जिजाऊ बनावे लागेल, एक संस्कार क्षम पिढी ही काळाजी गरज आहे.ग्रामीण भागातील नागरिक खुश आहेत का ?सन २०२० साली भारत महासत्ता होणार हे स्वप्न माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचे होते. याला फक्त १ वर्ष बाकी आहे. मातीचे घर गेले सिमेंटचे घर आले, कच्चे रस्ते गेले. चांगले रस्ते आले. चार चाकी आली. मात्र ग्रामीण भागातील लोकांची मानसिकत्ता बदलली आहे का? सर्व नागरिक खुश आहे का? हे सर्व झाले तरच देश महासत्ता बनेल. हे सर्व करीत असताना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य, अधिकार ओळखूनच वागले पाहिजे, असेही सुनंदा पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकFamilyपरिवार