वनविभागाला बिबट्याची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:34 AM2018-10-05T00:34:01+5:302018-10-05T00:35:30+5:30

गेल्या दोन महिन्यांपाासून बिबट्याच्या भीतीने परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरूवारी हा बिबट्या राणीउंचेगाव तसेच अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर लगेचच वनविभागाने खबरदारी घेत शार्प शुटरसह वैद्यकीय पथक औरंगाबाद येथून पाठविले होते. ही शोध मोहीम रात्री आठ वाजे पर्यंत चालली मात्र, बिबट्याने पुन्हा एकदा वनविभागाला हुलकावणी दिली आहे.

Duplication of forest department | वनविभागाला बिबट्याची हुलकावणी

वनविभागाला बिबट्याची हुलकावणी

Next
ठळक मुद्देशहापूर परिसर : शार्पशूटरसह वैद्यकीय पथक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/रणीउंचेगाव : गेल्या दोन महिन्यांपाासून बिबट्याच्या भीतीने परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान गुरूवारी हा बिबट्या राणीउंचेगाव तसेच अंबड तालुक्यातील शहापूर येथे दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर लगेचच वनविभागाने खबरदारी घेत शार्प शुटरसह वैद्यकीय पथक औरंगाबाद येथून पाठविले होते. ही शोध मोहीम रात्री आठ वाजे पर्यंत चालली मात्र, बिबट्याने पुन्हा एकदा वनविभागाला हुलकावणी दिली आहे.
राणीउंचेगाव, तळेगाव परिसरतही हा बिबट्या फिरत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून वडीगोद्री, शहापूर, शहागड तसेच राणीउंचेगाव, तळेगाव या भागात या बिबट्याची दहशत आहे. या बिबट्याने आता पर्यंत अनेक मुक्या प्राण्यांचा फडशा पाडला आहे. तर एका शेतमजूराचा बळीही घेतला आहे.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यात त्यांना यश मिळत नसलस्याचे दिसून येत आहे. यासाठी तीन पथके आणि ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालाचाली टिपण्यात आल्याने वनविभागाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. चार दिवसांपूर्वी तो वनविभागच्या शार्पशुटरसह वैद्यकीय पथकाच्या नजेरेसही पडला. मात्र, त्याला बेशुध्द करणारे इंजेक्शन त्याच्यापर्यंत गणमधून पोहचे पर्यंत तो गर्द ऊसाच्या शेतीत पळून गेल्याने उत्साह मावळला.
दरम्यान गुरूवारी येथील सहायक वनसरंक्षणक जी.एम. शिंदे यांना शहापुर परिसरातील नागरिकांनी माहिती दिल्यानुसार त्यांनी लगेचच औरंगाबाद येथे संपर्क करून वैद्यकीय पथकासह शार्प शुटरला शहापूर परिसरात पाचारण केले होते. जवळपास शंभर ते १५० ग्रामस्थांनी देखील बिबट्याला पकडण्यासाठी चंग बांधला होता. मात्र गुरूवारी दिवसभर त्याचा शोध घेऊनही तो नजरेस न पडल्याने या मोहीमेचा हिरमोड झाला.

Web Title: Duplication of forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.