शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवर चुकीचे नंबर टाकणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:08 IST

चुकीचे नंबर टाकून वाहने चालविणाऱ्या टोळीचा एडीएसच्या पथकाने पर्दाफाश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चुकीचे नंबर टाकून वाहने चालविणाऱ्या टोळीचा एडीएसच्या पथकाने पर्दाफाश केला. ही कारवाई बुधवारी दुपारी शहरासह इतर ठिकाणी करण्यात आली. यावेळी १५ लाख ५५ हजार रूपये किमतीची सहा वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.वाहनावरील खोट्या चेसीस नंबर टाकून कागदपत्रे नसताना वाहने चालविली जात असल्याची माहिती एडीएसचे पथकप्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी दुपारी जालना शहरातील गरीबशहा बाजार भागात कारवाई करून शेख शकील शेख अहेमद (रा. अंबड), शेख मोबीन शेख मतीन (रा.जालना) या दोघांना ताब्यात घेतले. शेख शकील हा शेख मोबीन याच्या मदतीने वाहनांवर चुकीचे नंबर टाकतहोता.मागील पाच-सहा महिन्यांत वाहनांवर खोटे नंबर टाकल्याची माहिती संबंधितांनी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी आष्टी, परतूर, अंबड या भागात कारवाई करून १५ लाख ५५ हजार रूपये किमतीची सहा वाहने ताब्यात घेतली.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, सपोनि बी.डी. बोरसे, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद, रंगे, पोना सुभाष पवार, नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार, सचिन आर्य, श्रीकुमार आडेप, धनाजी कावळे, विजय निकाळजे आदींनी केली.तीन ठिकाणांहून वाहने ताब्यातपोलिसांनी आष्टी येथील युसूफ समद बागवान यांचे वाहन (क्र.एम.एच.१२- ए.एफ.७९६६, तारेख सुभान शेख यांचे वाहन (क्र.एम.एच.१२- पी.ए. ०७१३), महंमद फारूख गुलाम दस्तगीर बरेखाने यांचे वाहन (क्र.एम.एच.२४- एफ.०९९३), परतूर तालुक्यातील शिंगोणा येथील दिनकर पुंजाजी घुगे यांचे वाहन (क्र.एम.एच.२१- ३६६५).घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील नारायण निवृत्ती मिठे यांचे वाहन (क्र.एम.एच.१६-ई. ३४६१ व तीर्थपुरी येथील गणेश दगडू भोसले यांचे वाहन (क्र.एम.एच.१२- ४२९१) कारवाई करून ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसArrestअटकbikeबाईकfour wheelerफोर व्हीलर