शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जालना जिल्ह्यात सिंचन, पाणीपुरवठ्याची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 12:08 AM

उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांचे ग्रहण-भाग-३बाबासाहेब म्हस्के/जालना : उन्हाळा तोंडावर आला असताना जिल्ह्यातील अनेक गावांमधील पेयजल योजनेची कामे ठप्प आहेत. सिंचन आणि बांधकाम विभागाच्या अनेक कामांना ब्रे्रक लागला आहे. या तिन्ही विभागांत अधिकारी व कर्मचा-यांची एकूण ५७ पदे रिक्त आहेत.जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या महिन्यात जिल्ह्यातील अनेक गावे व वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २२ कोटी ४८ लाखांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे. टंचाई आराखडा तयार केला असला तरी अनेक गावांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसह, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली नाहीत. मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. सिंचन विभागामार्फत केल्या जाणा-या जलसंधारणाच्या कामांनाही रिक्त पदांमुळे ब्रेक लागला आहे. या विभागाच्या माध्यमातून केली जाणारी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर सिमेंट नाला बांध व अन्य कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. अपूर्ण कर्मचा-यांमुळे या विभागाकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती वेळेत पाठवल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता, आरेखक इ. पदे रिक्त असल्याने सिंचन, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या कामांवर परिणाम झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. विशिष्ट जबाबदारी असणा-या अनेक तांत्रिक अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने, ही कामे तात्पुरती इतर अधिकायांकडून करून घेतली जात आहेत. त्यामुळे कामांच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.---------------सिंचन, बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांशी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांच्या ६६ पदांपैकी आठ, स्थापत्य अभियंता सहायकांची ६१ पैकी २७, आरेखक, तारतंत्री, संगणक, जोडारी ही पदे रिक्त असून, तिन्ही विभागांत पदोन्नतीने भरावयाची १३ पदे रिक्त आहेत. याच विभागांचा उपविभाग असलेल्या यांत्रिक विभागातही वायू संपि.चालकाची तीन, जॅक ड्रीलरचे एक व कनिष्ठ अभियंताचे एक पद रिक्त आहे.-------------