शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी फुलशेती धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:47 IST

फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यात उन्हाची तिव्रता वाढली असून, भूजल पातळीत झपाट्याने खालावत आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने फुले शेती आणि फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.तालुक्यात वलखेड, शेवगा, सालगाव, बाबई, परतूर शिवाराचा काही भाग, चिंचोली आदी गावात विविध प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. फुलशेती म्हणजे नगदी पैसा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने अनेक शेतकरी फुलाच्या लागवडीकडे वळले आहेत. तालुक्यातील शेवंती, मोगरा, गुलाब, केवडा आदी फुलांना मराठवाड्यासह बाहेरील हैदराबाद राज्यात सुध्दा मागणी असते. अनेक वर्षांपासून या तालुक्यात फुलांची शेती करतात.यावर्षी कुठल्याच शेतमालास भाव नाही. त्यातच विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने फुलशेतीला पुरेसे पाणी देण्यास अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या लग्नसराई असल्याने फुलशेतीतून हाती पैसा येईल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र, पाण्याअभावी कळ्या सुकू लागल्याने शेतक-यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे.खर्च करूनही हाती फारशी मिळत येणार नसल्याचे जाणवू लागल्याने शेतक-यांमध्ये नाराजी आहे. आता लागवडीचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतक-यांना सतावत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळFarmerशेतकरी