शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

मुसळधार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले; जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 14:45 IST

rain in Jalana जनजीवन विस्कळीत होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले

भोकरदन ( जालना ) : तालुक्यात रात्री झालेल्या धुव्वाधार पावसाने दाणादाण उडाली आहे. या पावासामुळे पूर्णा, केळना, गिरजा, जुई, रायघोळ, धामना या नद्यांना मोठे पूर आले आहेत. सर्वच नद्यांनी पात्र सोडले असल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर भोकरदन शहरातुन वाहणाऱ्या केळना नदीला आलेल्या पुरामुळे जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे भोकरदन ते बुलढाणा- चिखली रस्ता बंद झाला असून पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे.

सोमवारी रात्री भोकरदन, सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मंगळवारी सकाळी या परिसरातील सर्वच नद्यांना पूर आला. जनजीवन विस्कळीत होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरातील केळना नदीवरील पुलाचे काम सुरू असून या पुलावर काम करीत असलेली एक मशीन नदीपात्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे, तर न्यायालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामासाठी खोदलेल्या खड्यात रात्री माल ट्रक गेला. त्यामुळे ट्रकचे नुकसान झाले आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राकदार यांनी फलक न लावल्यामुळे हा अपघात झाला आहे.

पंधरा वर्षानंतर पूल पाण्याखालीभोकरदन ते  जाफराबाद रोडवरील केळना नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे या पुलावर 32 ते 3 फूट पाणी आहे, यापूर्वी 2006 मध्ये या पुलावर पाणी आले होते त्यानंतर तब्बल 15 वर्षानंतर हा पूल पाण्याखाली गेला आहे तसेच म्हाडा कॉलनी व बसस्टँड च्या बाजूने येणारे नाले नागरिकांनी अतिक्रमण करून अरुंद केल्यामुळे या नाल्याच्या पुरामुळे रफिक कॉलनी, हबीब कॉलनी,बाजारपेठ या परिसरातील घरात पाणी शिरले आहे, तुळजाभवानी नागरकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहे,  

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊस