शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केदारखेडा मंडळात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:26 IST

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळातील दहा गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळातील दहा गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाअभावी धूळपेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, आन्वा, लेहा, जळगाव सपकाळ आदी परिसरात पावसाने कहर केला आहे. नदीला आलेला पुरामुळे ेशेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे याच तालुक्यातील केदारखेडा परिसरात तूरळक पाऊस वगळता अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्यातच एकीकडे पावसाच्या कहरमुळे पेरणी वाया जाण्याची भीती आहे तर दुसरीकडे अद्यापही पेरणीलाच सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. बुधवारपासून परिसरता ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. आजूबाजूस सर्वत्र जोरदार पाऊस झाला असला तरी परिसरातील दहाहून अधिक गावांना पावसाने हुलकावणी दिली आहे.परिसरात पाऊस झाला नसला तरी पूर्णा नदीला मात्र पाणी आले आहे. वरच्या भागात ब-यापैकी पाऊस झाल्याने पूर्णा नदी वाहू लागल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. सुरुवातील परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले. मात्र, जोरदार पाऊसच नसल्याने शेतक-यांनी सध्या पेरणी थांबवली आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षा लागली आहे.पावसाच्या रिपरिपमुळे पारध परिसरात दुबार पेरणीचे संकटलोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. तर काही शेतक-यांनी केलेली धूळपेरणी वाया गेली आहे. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.परिसरात २२ जून पासून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातून वाहणारी रायघोळ नदी आठवड्यातून तब्बल पाच वेळेस दुथडी भरून वाहिली. नदीच्या पुरामुळे नदी काठच्या शेतक-यांची जमीन खरडून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील पारध खुर्द, शेलुद, पद्मावती आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस तब्बल अडीच तास धो -धो कोसळत होता. त्यामुळे अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. या परिसरात जवळपास साठ टक्के शेतक-यांनी आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, मका आणि मिरचीची लागवड केली आहे. बियाणे आणि खरावर शेतक-यांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेकांची पेरणीच वाहून गेली आहे. शेतात पाणी साचल्याने लहान लहान कोंब नष्ट झाले. त्यामुळे इतके दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणा-या शेतक-यांना पाऊस वै-यासारखा वाटू लागला आहे. वाया गेलेल्या बी- बियाणांचा खर्च कसा करावा याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. परिसरात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतक-यांनी केली.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळagricultureशेती