शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चालकाला डुलकी लागल्याने मजुरांची जीप उलटली; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 3:30 PM

हा अपघात शुक्रवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोडडगाव फाट्याजवळ घडला.

ठळक मुद्देजखमी दोन मजुरांची प्रकृती गंभीर२२ जण किरकोळ जखमी

वडीगोद्री (जालना) : मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन जाणारी मालवाहतूक जीप उलटली झाली. या अपातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. यात महिला, पुरूषांचाही समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोडडगाव फाट्याजवळ घडला.

मध्यप्रदेशातील ३० मजुरांना गेवराई येथील बाहुबली जिनिंग येथे कामासाठी एका वाहनातून (क्र.एम.पी.१०- जी. ११८२) नेण्यात येत होते. हे वाहन औरंगाबाद - सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ (ता.अंबड) शुक्रवारी सकाळी आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाले. तीन पलट्या मारलेले वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. या भीषण अपघातात वाहनातील २५ मजूर जखमी झाले. पैकी तिघे गंभीर तर २२ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिकेतून व इतर वाहनातून जखमींना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिनेश छतरसिंग सोलनकी (२६ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी मध्य प्रदेश) या मजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर संगीता सोलंकी (१५ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी), पप्पू रमेश चव्हाण (२० रा. आमसरी ता. भगवानपुरा, जि.खरगोन), गणेश काकडी जमरे (२१ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी), तुकाराम ब्राहमने (१२ रा. आमसरी, ता.भगवानपुरा, जि.खरगोन), बिला गणेश जमरे (१८ रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी),संगीता भुवरे (१८) स्नेहल, शितल यादव (२२), वर्षा सोलनकी (२०), मंजू कांतीलाल दुवे (२०), रेवती हिरालाल सोलंकी (२४), घोडेलाल जलसिंग भुवरे (२४ सर्व रा. शिरवेल ता. शेंडवा जि. बडवानी मध्यप्रदेश) हे मजूर या अपघातात जखमी झाले.

झोपेने केला घातचालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी वाहनातील अनेक मजूरही झोपेत होते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याचे काही मजुरांनी सांगितले. अपघातादरम्यान अनेक महिला, युवक मजूरही झोपेत होते. त्यामुळे अचानक झालेल्या अपघातानंतर ते घाबरले होते. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना