शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Manoj Jarange Patil : कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा ते करा, लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार देणार नाही - मनोज जरांगे पाटील

By विजय मुंडे  | Updated: March 30, 2024 18:45 IST

Manoj Jarange Patil : मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

जालना : वेळ कमी पडल्याने गावा-गावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आले नाही. आलेले अहवाल अपुरे आहेत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देवून समाजाला हरविण्याचे पाप मी करणार नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठींबा देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी गावा-गावातून आलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. दिवसभरात आलेल्या अहवालाचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला. आरक्षणासाठी महिलांवर लाठीहल्ला झाला. हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. शेकडो युवकांचे बळी गेले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढवायची असे मत समाजाचे होते. त्यासाठी गावा-गावात जावून समाजाच्या मतांचा अहवाल आणा, असे सांगितले होते. परंतु, आलेला अहवाल अपुरा आहे. राजकारणापुढे मुख्य प्रश्न असलेले आरक्षण मागे पडत आहे. अनेक ठिकाणी गावखेड्यातील मराठ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ कमी पडला. आलेला अहवाल अपुरा आहे. त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होवू नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करू. आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा. पण ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

विविध जाती-धर्माच्या प्रतिनिधींनी घेतली भेट 

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह धनगर, मुस्लिम, मागासवर्गीय, लिंगायत व इतर अनेक समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेवून लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली होती. परंतु, ३० तारखेला मराठा समाजाचा येणारा अहवाल आणि त्यातील समाजाची मते पाहूनच आपण अंतिम निर्णय घेणार होतो. त्यामुळे आपण कोणालाही पाठींबा दिला नव्हता.

राजकारणाला कमी समजू नका

अपेक्षित अहवाल आला असता तर राजकारणातही आपण प्रतिडाव टाकले असते. परंतु, तो आला नाही. राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही भाग वेगळे आहेत. राजकारणात समाज जाेडता आला पाहिजे. भावनेच्या आहारी जावून निर्णय घेता येत नाही. राजकारणाचे गणित वेगळे आणि समाजकारणाचे गणित वेगळे असते. राजकारणात प्रत्येक मतदाराची मने जिंकावली लागतात. त्यांच्या प्रश्नाला हात घालावा लागतो. राजकारण सोपे समजू नका आणि त्यामुळेच आपण जात हारू नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षण