शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

परतूर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:09 IST

परतूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यासाठी बँकेत पैसे उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. ...

ठळक मुद्देसंताप : नुकसान अनुदान वाटपात अडचणी; शेतकऱ्यांनी बँकेचे शटर ओढले खाली

परतूर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान वाटप करण्यासाठी बँकेत पैसे उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून, शेतक-यांनी यावेळी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरत काम बंद पाडले होते.परतूर शहरतील मोंढा भागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. सध्या या शाखेतून शेतक-यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप सुरू आहे. या बँकेत शुक्रवारी दुपारी रोहीना (खर्दु) व रोहिणा (बु.) या दोन्ही गावातील शेतकºयांना अनुदान वाटप केले जाणार होते. त्यामुळे अनुदान उचलण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने आले होते. मात्र, वाटपासाठी बँकेत पैसेच नसल्याने आलेल्या खातेदार शेतक-यांनी गोंधळ घालत बँकेचे शटर खाली ओढून कामकाज बंद पाडले. हा गोंधळ अर्धा तास सुरू होता. नंतर शाखा व्यवस्थापकांनी बँकेच्या सरव्यवस्थापकांना बोलावून घेतले. त्यांनी सोमवारी पैसे उपलब्ध होतील त्यानंतर खातेदारांचे अनुदान वितरीत करण्यात येईल असे सांगितल्यानंतर हा गोंधळ थांबला. या बँकेस जालना येथील मध्यवर्ती बँकेकडून पैसे उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र मुख्य शाखेतच पैसे नसल्याने परतूर शाखेस पैसे मिळाले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी वाटपपैसे नसल्याने शाखेत अर्धा तास गोंधळ झाला. एकत्रित आलेली दोन गावे आणि ६०० खातेदार होते. त्यांना ४६ लाख रूपये वाटप करायचे होते. इतकी रक्कम शाखेत नसल्याने अनुदान वाटपात अडचण आली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. सोमवारी पैसे उपलब्ध होणार असून, पैसे उपलब्ध झाल्यानंतरच शेतक-यांना अनुदान वाटप केले जाणार आहे.- ए. एच. काऊतकर, शाखा व्यवस्थापक, परतूर

टॅग्स :JalanaजालनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagitationआंदोलन