शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप किसान मोर्चाच्या जालना जिल्हाध्यक्षांची महिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:09 IST

जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीने एका शेतकऱ्यासह तीन महिलांना जबर मारहाण केली.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी (जि. जालना) :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात सोमवारी भाजप राज्य कार्यकारिणीचे मंथन सुरू असतानाच जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीने एका शेतकऱ्यासह तीन महिलांना जबर मारहाण केली. यानंतर त्यांना खड्ड्यात जिवंत पुरण्याचाही प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून भवर यांना अटक करण्यात आली आहे.निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड व कृष्णा खांडेभराड यांच्या गट क्र. ४१७ मधील शेताचा न्यायालयात वाद सुरू आहे. सोमवारी सकाळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर व अन्य १० ते २० जणांनी या शेतात पोकलेनने विहीर खोदण्याचा प्रयत्न केला. यावेळी खांडेभराड यांनी या जमिनीचा वाद चालू आहे. त्यावर अद्याप निकाल लागलेला नाही, असे सांगून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त होऊन भवर व इतरांनी गंगा बळीराम खांडेभराड, रेणुका कृष्णा खांडेभराड, प्रयाग विष्णू खांडेभराड व विठ्ठल नामदेव खांडेभराड यांना जबर मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही तर तेथे असलेल्या एका खड्ड््यात या चौघांना पुरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी शेतकरी मदतीला धावल्याने मोठा अनर्थ टळला. आरोपींनी याशिवाय खांडेभराड यांच्या कुटुंबातील महिलांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या शेतक-यांनाही जातीवाचक शिव्या दिल्या. या प्रकरणी ज्ञानेश्वर खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रावसाहेब भवर यांना अटक करण्यात आली आहे.दवाखान्यात येऊनही मारहाणयातील जखमी महिला व शेतक-याला टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथेही आरोपींपैकी काहींनी येऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे टेंभुर्णीतही काही काळ तणाव निर्माण झाला होता.भवर यांच्या तक्रारीवरून गुन्हाया प्रकरणी रावसाहेब भवर यांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपण गट क्र. ४१७ ही खरेदी खतावर कृष्णा खांडेभराड, ज्ञानेश्वर खांडेभराड आदींकडून घेतली आहे. मात्र या जमिनीचा वाद सुरू असला तरी खरेदीपासून माझ्या ताब्यात आहे. सोमवारी मी व माझे नातेवाईक या शेतात विहीर खोदण्यासाठी आलो असता विठ्ठल खांडेभराड, ज्ञानेश्वर खांडेभराड व त्यांच्या घरातील महिलांसह सात जणांनी हे काम अडवून आमचे पूजेचे साहित्य फेकून दिले. व आम्हाला शिवीगाळ व मारहाण करून मशीन पेटविण्याची धमकी दिली. यात माझे निवडुंगा येथील सासरे व मेव्हणे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे. शिवाय भवर यांच्या पत्नीचे सोन्याचे गंठण या मारहाणीत हरविल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर खांडेभराड व अन्य सात जणांवर टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला