शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उद्या जालन्यात होणार ‘सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:16 IST

संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संपूर्ण राज्य आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ चे सोमवारी २५ फेब्रुवारी रोजी मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना येथे सकाळी साडेअकरा वाजता वितरण होणार आहे.ज्युरी मंडळाकडे जिल्ह्यातील सरपंचांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे.गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणा-या मेहनती व कर्तबगार विजेत्या संरपंचांना फळबाग तज्ज्ञ तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे यांच्या हस्ते े‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सीताबाई मोहिते, प्रमुख मार्गदर्शक कृषीभूषण उध्दव खेडेकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे.बीकेटी टायर्स या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक तर पतंजली आयुर्वेद सहप्रायोजक आहे.सलग दुस-या वर्षीही या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पुरस्कारासाठी प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या सोहळ््यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ च्या वतीने करण्यात आले आहे.११ कॅटेगरी, दोन विशेष पुरस्कारसरपंचांनी गावात जल, वीज, व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन- लोकसहभाग, रोजगार व कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व आणि सरपंच आॅफ द इयर हे दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.सरपंचांना उपस्थित राहण्याचे आवाहनजालना येथे सरपंच अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमाचे वितरण सोमवारी सकाळी ११.३० मधुर बॅक्वेट हॉल, दुर्गामाता रोड जालना (मशीन हॉस्पीटल समोर) येथे करण्यात येणार आहे. सरपंच अ‍ॅवॉर्डसाठी अर्ज भरलेल्या सरपंचांप्रमाणेच अन्य गावातील सरपंचांनाही सोहळ््यास उपस्थित राहता येणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचLokmat Eventलोकमत इव्हेंट