शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवालीतील ओबीसी उपोषणकर्ते आणि मंत्री सावे यांच्यात चर्चा, आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:59 IST

ओबीसी उपसमितीचे सदस्य अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर पाचव्या दिवशी उपोषण स्थगित

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू होते. ओबीसी उपसमितीचे सदस्य आणि मंत्री अतुल सावे यांनी फोनकरून आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखणे, विठ्ठल तळेकर, श्रीहरी निर्मल आसाराम डोंगरे यांनी पाणी पिले. 

पुढील आठवड्यात मंगळवारी मुंबई येथे ओबीसी उपसमितीची बैठक ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी उपोषणकर्ते, आंदोलक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना मागण्यासंदर्भात आश्वस्त करू असे सांगण्यात आले. जर मंगळवारी सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुढील परिणामास उपसमिती जबाबदार असेल, असा इशारा ओबीसी आंदोलकांनी उपोषण स्थगित करण्यादरम्यान दिला.

जरांगेंनी मराठा जात संपवलीएकीकडे फडवणीस साहेब म्हणतात, आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावला नाही. तर एकीकडे जरांगे पाटील म्हणतात, आम्ही ओबीसीत आहोत. सरकार मूर्खात कोणाला काढतय हे तरी सांगा? सप्टेंबर २ व ३ तारखेला काढलेला जीआर हा शब्द रचना बदलून सगळे सोयरेचाच आहे. जरांगे यांनी हजारो वर्षाचा मराठा जातीचा इतिहास नामशेष केला आहे. आता मराठा म्हणून कोणीच नाही राहिलेलं, अशी खोचक टीका आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी केली. तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगे यांना भेटण्यास हॉस्पिटलमध्ये जाऊन बसत आहेत. तेथे जरांगे पाटील सूचना देतायत अन् विखे पाटील क्लार्क सारखे लिहून घेतात. जरांगे पाटील यांनी सांगितलेला निर्णय विखे पाटील यांना मान्य करावा लागतो, असा आरोपही तळेकर यांनी विखे पाटील यांच्यावर केला.

.. तर मुंबईत धडकूमंगळवारी उपसमितीसमोर मागण्या मांडू. समितीचा निर्णय आम्हाला आश्वस्त करणारा नसेल तर आम्ही पुन्हा आंतरवालीत येऊ. जर सरकारला मुंबईची भाषा कळत असेल तर आम्ही मुंबईलाही जाऊ, असा इशाराही आंदोलक तळेकर यांनी दिला आहे.

काय होत्या मागण्या?- जालना, बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटीचा अहवाल सरकारने जाहीर करावा - सप्टेंबर २ व ३ तारखेला काढलेले जीआर रद्द करावेत- ५८ लाख दिलेले कुणबी प्रमाणपत्र त्वरित रद्द करावे- निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करा- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये - सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशा मागण्या आंदोलकांनी केल्या होत्या.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणAtul Saveअतुल सावेMaratha Reservationमराठा आरक्षण