शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

शिवभोजन थाळीत दिले धोंड्याचे जेवण; अनपेक्षित पाहुणचाराने लाभार्थी सुखावले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 6:47 PM

Shivbhojan Thali Dhonde Jewan News नेहमीच्या जेवणासोबत पुरण पोळी, खीर व धोंडा असे जेवण दिले.

ठळक मुद्देनेहमीच्या थाळीसोबत धोंडे जेवणाचा लाभ

- फकिरा देशमुख

भोकरदन : येथील शिवभोजन केंद्रात मंगळवारी लाभार्थ्यांना नियमित थाळी सोबत धोंड्याचा पाहुणचार मिळाल्याने सुखद धक्का बसला. नियमित थाळीसोबत पुरणपोळी व धोंड्याचे जेवण देत केंद्र चालकाने सामाजिक बांधिलकी जपली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

शिवभोजन थाळीने कोरोना काळामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्येही अनेक गरजवंतांची भूक भागवली आहे. सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र धोंड्याचा पाहुणचार देणे सुरु आहे. गरिबांना सुद्धा असा पाहुणचार मिळावा म्हणून केंद्रात नेहमीच्या जेवणासोबत पुरण पोळी, खीर व धोंडा असे जेवण देण्याचा अनोखा उपक्रम  येथील केंद्र चालक साहेबराव बारोकर यांनी राबवला. लाभार्थ्यांचा चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान लाभल्याचे केंद्र चालक बारोकर यांनी सांगितले. थाळी केंद्रात धोंड्याचा पाहुणचार मिळाला याचा खूप आनंद झाला. या पूर्वी कधीही धोंड्याचे जेवण खाण्याचा योग आला नव्हता असे मनोगत लाभार्थी बन्सीधार कचके यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले. 

प्रशासनाकडूनही कौतुक उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी येथे भेट देऊन गरिबांना देण्यात आलेल्या या पाहुणचाराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती मिळताच प्रशासनाकडून तहसीलदार संतोष गोरड यांनी  कौतुक केले आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयJalanaजालना