शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

घरफोड्या करणारे डिच्चू टोळीचे सराईत गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:50 IST

शहरात ४ घरफोड्या करणाऱ्या डिच्चु टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात ४ घरफोड्या करणाऱ्या डिच्चु टोळीच्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. किशोर बाळू खंदारे, गणेश शंकर शिंदे (दोघे, रा. जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ क्रुझर जिपसह ७ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जालना शहरातील मस्तगड येथील उढाण कॉम्प्लेकस येथे असलेल्या अजय स्वरुपंचद गांग यांच्या घरी किशोर खंदारे व त्याचा साथीदार गणेश शिंदे यांनी घरफोडी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शिर्डी येथून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, शहरातील उढाण कॉम्पलेक्स येथील घर फोडून घरातील रोख रक्कम, दागीने व लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २५,००० रुपये रोख, एक लॅपटॉप ४५,००० रुपये असा एकूण ७०,००० हजारांचा माल जप्त केला. दरम्यान, अधिक चौकशी केली असता, त्यांनी जालना शहरात तीन घरफोड्या केल्याची कबूली दिली. बालाजी नगर येथील शेख अकबर शेख ईसाक यांच्या घरातून सोन्याचे दागिन्यांसह ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरला. तसेच सोनलनगर येथील ढालराज तिपय्या म्हेत्रे यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यासह ४५ हजारांचा माल लंपास केला होता.माऊली नगर येथील कृष्णा माणीकराव जाधव यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह ६० हजारांचा माल लंपास केला. त्याचबरोबर देहेडकरवाडी येथून क्रुझर जिप नेल्याची कबुली त्यांनी दिली.त्यांच्याकडून चार घरफोड्यातील २ लाख २९ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने व एक क्रुझर जिप ५ लाख रुपये असा ७ लाख २९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. दरम्यान, दोघांना न्यायलयात हजर करण्यात आले असता, त्यांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि जयसिंग परदेशी, विश्र्वनाथ भिसे, पोहेकॉ हरीष राठोड, सॅम्युअल कांबळे, प्रंशात देशमुख, संजय मगरे, समाधान तेलंग्रे, कृष्णा तंगे, विनोद गडदे, सागर बाविस्कर, रंजित वैराळ, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर, विलास चेके, परमेश्वर धुमाळ, संदिप मांन्टे, लखनसिंग पचलोरे, विष्णु कोरडे, महिला कर्मचारी मंदा बनसोडे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक