शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

'३९ वर्षे निष्ठा ठेवूनही पक्षात विचारले जात नाही'; उद्धवसेनेला झटका, जालना जिल्हाप्रमुख शिंदेसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:47 IST

छत्रपती संभाजीनगरमधून जालन्यातील शिवसेना चालविली जात आहे.

जालना : मागील ३९ वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम केले. वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. तरी पक्ष सोडला नाही. परंतु, गत काही महिन्यांपासून पक्षीय कामकाज छत्रपती संभाजीनगरमधून चालत आहे. सर्वच निर्णय तेथून होत असतील तर आम्ही इथं काय कामाचे ? अशी व्यथा शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी बुधवारी व्यक्त केली. बदललेले पक्षीय वातावरण पाहूनच आपण शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.

१९९० मध्ये मागणी करूनही विधानसभेसाठी संधी मिळाली नाही. २००४ मध्ये मी नगराध्यक्ष असताना उमेदवारी मिळाली. परंतु, दोन दिवसांनी माझी उमेदवारी कापण्यात आली. २००९ मध्ये अर्जुन खोतकर घनसावंगीत गेल्याने एक दिवस राहिलेला असताना उमेदवार नाही म्हणून मला उमेदवारी दिली. तरी ५८ हजार मते घेतली. नंतर संघटन बांधणी केली. परंतु, २०१४ मध्ये उमेदवारी नाकारली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गोदावरी खोरे महामंडळावर माझी नियुक्ती केली. तीन महिन्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि माझेच महामंडळ बरखास्त करून टाकले.

मुंबईतून बैठकीसाठी जिल्ह्यात येणारे नेतेही पदाधिकारी, शिवसैनिकांना बोलताना योग्य भाषा वापरत नाहीत. आज पक्षप्रमुखांचा दौरा असेल तर आम्हाला माहिती दिली जात नाही. नव्हे छत्रपती संभाजीनगरमधून जालन्यातील शिवसेना चालविली जात आहे. छगन भुजबळ यांनी १९९१ मध्ये पक्ष सोडला, त्यावेळी ते मराठवाड्याची जबाबदारी देणार होते. परंतु, मी पक्ष सोडला नाही. २०१४ मध्ये भाजपने जालन्यातून उमेदवारी देऊ केली होती. परंतु, आपण ती नाकारली. इतकी पक्षनिष्ठा ठेवूनही आज आपल्याला विचारले जात नाही. त्यामुळे आपण शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहराचा विकास हा आपला ध्यास असून, सत्तेच्या माध्यमातून तो आपण करू शकतो, हा विश्वास असल्याचेही अंबेकर म्हणाले.

पाणीपुरवठा योजना माझ्या कार्यकाळातीलजालना जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्याची स्पर्धा वेळोवेळी पहावयास मिळते. परंतु, ती योजना राबविण्याचा ठराव मी नगराध्यक्ष असताना घेतला. सर्वे करून अहवाल पाठविला आणि माझ्याच कार्यकाळात त्या योजनेला मंजुरी मिळाली. अध्यक्षपदाच्या शेवटच्या वेळी २३० कोटींचे टेंडर मी काढू शकलो असतो. परंतु, विनाकारण आरोप आणि चर्चा होतील म्हणून आपण तो निर्णय घेतला नाही, असेही आंबेकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav's Faction Suffers Setback: Jalna District Chief Joins Shinde Camp

Web Summary : Bhaskar Ambekar, upset after 39 years of service and feeling ignored, defects to the Shinde faction, citing neglect and centralized decision-making in Sambhajinagar.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेJalanaजालना