शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आगारप्रमुखांना पाच हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:46 IST

शिवशाही बसमध्ये असलेल्या सुविधांमधील एसी, मोबाईल चार्जिंग बंद ठेवल्याप्रकरणी जालना आगारप्रमुखांना जिल्हा ग्राहक मंचने पाच हजार रूपये दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिवशाही बसमध्ये असलेल्या सुविधांमधील एसी, मोबाईल चार्जिंग बंद ठेवल्याप्रकरणी जालना आगारप्रमुखांना जिल्हा ग्राहक मंचने पाच हजार रूपये दंड ठोठावला. ही घटना १२ जुलै रोजी घडली होती.जालना येथील बसस्थानकातून सतिश रतनलाल दायमा व गणेश रतनलाल बजाज हे १२ जुलै रोजी औरंगाबादकडे जात होते. ते शिवशाही बसमध्ये एसी, मोबाईल चार्जिंग असल्याने ते त्या बसमधून प्रवास करीत होते. मात्र, बसमधील एसी व मोबाईल चार्जिंग नव्हती. त्यामुळे सतीश दायमा यांनी अ‍ॅड. महेश धन्नावत यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात आगार प्रमुखांनी अर्जदाराने बसबद्दल समस्या असतील तर लगेच वाहकाकडे तक्रार करणे, संबंधित स्थानकातील नोंद पुस्तिकेत नोंद करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यावेळी अ‍ॅड. धन्नावत यांनी वाहकाला तोंडी तक्रार केली होती. व तक्रार पुस्तिका बसमध्ये उपलब्ध नसतात. बस चांगल्या स्थितीत असेल तर निघतेवेळी जेथे बसची तपासणी केली त्याचा अहवाल आगार प्रमुखांनी सादर केला असता किंवा वाहकाचे शपथपत्र दाखल करू शकले असते. शिवशाही बस हवाबंद असल्याने व एसी सुविधा बंद असल्याने प्रवास करणे असायह्य होते, असा युक्तीवाद केला. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व विधीज्ञांचा युक्तीवाद ग्राह्य धरून ग्राहक मंचच्या सदस्य निता कांकरिया यांनी जालना आगार प्रमुखांना पाच हजार रूपये दंड व तिकीटाचे पैसे देण्याचा आदेश दिला. या प्रकरणात अ‍ॅड. महेश धन्नावत यांच्यासह अ‍ॅड. आशिष इंगळे, अ‍ॅड. शुभम भारूका, अ‍ॅड. श्वेता यादव यांनी काम पाहिले.बस सुस्थितीत ठेवणे गरजेचेराज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात प्रवाशांना अनेक विचित्र अनुभव येतात. असाच अनुभव सतिश दायमा व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला. त्यानंतर आता ग्राहक मंचनेच आगार प्रमुखांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी प्रवाशांना सर्व सोयी-सुविधा मिळण्यासाठी बसेस सुस्थितीत ठेवणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटीconsumerग्राहकCourtन्यायालय