शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जलसंधारण विभागाने फुलवले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:59 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळावर मात करण्यासाठी जालना येथील मृद व जलसंधारण विभागाने कार्यालय परिसरात विविध जातीचे तब्बल ३७०० रोपे लावून नंदनवन फुलवले आहे. या नंदनवनामुळे एरव्ही ओसडा असलेला हा विभाग आता सर्वांनाच आकर्षित करीत आहे.मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झाडांचे प्रमाणही कमी होत असल्याने पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होत आहे. परिणामी, दरवर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून, पाण्याच्या शोधासाठी प्रत्येकाला वणवण भटकंती करावी लागत आहे, असे असताना जिल्ह्यात मात्र सर्रासपणे वृक्षतोड सुरु आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.एकीकडे प्रशासनाकडूनच कारवाई केली जात नाही तर दुसरीकडे प्रशासनाचेच अधिकारी वृक्ष लागवडीवर भर देत आहेत. सध्या जालना शहरातील शासकीय रूग्णालयाच्या रस्त्यावर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी गिरवरसिंग सुसमणी यांच्या संकल्पनेतून कार्यालय परिसरातील ६६६ चौरस मीटरवर ‘मिया वाकी डेन्स फॉरेस्ट’ उभारण्यात आले आहे. यात विविध जातीच्या २१०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. तर अडीच हेक्टरवर १६०० रोपांची लागवड करून नंदनवन फुलविण्यात आले आहे.पावसाळ््यात या झाडांची लागवड करण्यात आली. खडकाळ जमीन असल्यामुळे येथे मोतीबाग येथून ७० टिपर गाळ आणून टाकण्यात आला. त्यात ही झाडे लावण्यात आली आहे. यासाठी जलसंधारण अधिकारी सुसमणी व कार्यालयीन अधीक्षक के. एस. जावळे यांनी परिश्रम घेतले.पाण्यासाठी हौद ; झाडांना ठिंबकचा आधारलागवड केलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी १३ हजार लिटर साठवण समता असलेला हौद तयार करण्यात आला आहे. तसेच बोअर देखील घेण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, यासाठी सर्वच झाडांना ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. झाडांना मोकाट जनावरांनी खाऊ नये, यासाठी वाल कम्पाऊंड देखील करण्यात आले. झाडांच्या निगराणीसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आला आहे.या जातींच्या रोपांची केली लागवडया परिसरात पिंपळ, लिंबू, रबर ट्री, गुलमोहर, बांबू, शेवगा, फणस, सिरस, बदाम, जास्वंद, चमेली, सिसम, पपई, एकझोरा, आवळा, कांचन, बूच, शेवरी, सागरगोटा, रेन ट्री, ग्रीसडिया, आंबा, करंज, रूठी, गोरखचिंच, शेमल, बोर, अंजन इ. जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणNatureनिसर्गGovernmentसरकार