शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

भोकरदनमध्ये दानवे विरूद्ध दानवेच; अनेक इच्छुकांचा हिरमोड, अपक्षांची संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 20:17 IST

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी २० जणांनी गाठली अंतरवाली सराटी

भोकरदन : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आ. संतोष दानवे विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यातील लढत उमेदवारीच्या घोषणेमुळे निश्चित झाली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळावी, यासाठी मतदार संघातील २० जणांनी अंतरवाली सराटी गाठली आहे.

भाजपकडून आ. संतोष दानवे यांचे नाव प्रथम जाहीर झाले होते. तर मविआत काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव सेनेने या मतदार संघावर दावेदारी सांगितली होती. परंतु, जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाजी मारत चंद्रकांत दानवे यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनच इच्छूक असणाऱ्या जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांचा हिरमोड झाला आहे. शिवाय काँग्रेससह उद्धवसेनेच्या इच्छुकांच्या आशेवरही पाणी पडले आहे. त्यामुळे हे इच्छूक मित्रपक्षात, स्व पक्षात काम करणार की अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे लवकरच समोर येणार आहे.

भोकरदन विधानसभा मतदार संघात २०१४ पासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघातून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेत चंद्रकांत दानवे आघाडीवर होते. त्यात आता दानवे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या इच्छुकांनी मनोज पाटील जरांगे यांच्याकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली आहे. जरांगे पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी २० हून अधिक इच्छुकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे जरांगे पाटील या मतदार संघात उमेदवार देणार का ? आणि दिला तर तो कोण असणार ? याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

पक्षश्रेष्ठींची होणार कसरतभोकरदन विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. काहींनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यात मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा प्रभावही या मतदार संघावर दिसून आला आहे. त्यामुळे काही पदाधिकारी, नेतेमंडळी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची चिन्हे असून, प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळी होवू नये, यासाठी आता पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokardan-acभोकरदनSantosh Danweyसंतोष दानवे