शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजूर परिसरातील दोन प्रकल्पांना संरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:25 IST

राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : राजूरसह परिसरातील पंधरा गावांची तहान भागविणाऱ्या बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, अज्ञात व्यक्तींकडून वारंवार खोडसाळपणा करून प्रकल्पाचे गेट उघडण्यात येत आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने दोन्ही प्रकल्पांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांधून होत आहे.भोकरदन तालुक्यातील बाणेगाव आणि चांधई एक्को मध्यम प्रकल्पातून राजूरसह पंचक्रोशितील पंधरा गावांची तहान भागवली जाते. दोन्ही प्रकल्पाच्या परिसरातील शेतकरी बुडीत क्षेत्रात खरीप पिकांची लागवड करतात. प्रकल्प पाण्याने तुडूंब भरण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर पिकाला अडचण निर्माण होवू नये, म्हणून काही अज्ञात व्यक्ती खोडसाळपणा करून प्रकल्पातील पाण्याला वाट मोकळी करून देतात. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. गेल्या तीन वर्षांपासून चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्यानंतर अज्ञात व्यक्तीने प्रकल्पाच्या मध्यभागी छिद्र पाडून पाण्याला वाट मोकळी करून दिली होती.लघूपाटबंधारे विभागाचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने माथेफिरूंचे फावत आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. दोन्ही प्रकल्पात जलसाठा न झाल्यास परिसरातील पंधरा गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते, यावर्षी पावसाळ््यात एकही पाऊस न झाल्याने दोन्ही प्रकल्प कोरडेठाक होते. मात्र, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.२९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री बाणेगाव मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे साखळी, कुलूप तोडून दरवाजे खुले करण्यात आले होते. यामुळे रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे अज्ञाताने साखळी कुलूप घेऊन पोबारा केलेला आहे.महसूल विभागाने बुधवारी दरवाजा बसविला. मात्र, संबंधित विभागाने यावर कोणतीच ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अज्ञात लोकांचे फावत असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी