शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

शौचालय अनुदान वाटपात दिरंगाई भोवली, तीन गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

By विजय मुंडे  | Updated: March 28, 2023 23:35 IST

कारवाईची टांगती तलवार, तीन दिवसांत वाटप करावी लागणार रक्कम

जालना : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचे बांधकाम करणाऱ्या जिल्ह्यातील तीन हजार ६३ लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. वेळोवेळी नोटीस देऊनही अनुदान वाटपात दिरंगाई केल्याने भोकरदन, जाफराबाद व घनसावंगीच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी मंगळवारी नोटीस बजावली आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात २२ हजार ४८६ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी आजवर १९ हजार ६९३ लाभार्थींनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. शौचालयाचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे तत्काळ अनुदान वाटप करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी दिले होते. त्यासाठी मार्च महिन्याच्या प्रारंभी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. शिवाय गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासकीय विभागाला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १६ हजार ६३० लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले; परंतु अद्यापही ३ हजार ६३ लाभार्थ्यांना अनुदान वाटप झालेले नाही. अनुदान रखडलेल्या तालुक्यांमध्ये भोकरदन, जाफराबाद व घनसावंगी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. सर्वांत कमी अनुदान वाटप या तालुक्यांत झाले असून, लाभार्थीही वंचित आहेत. ही बाब गांभीर्याने घेत सीईओ वर्षा मीना यांनी या प्रकरणात तिन्ही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे संबंधितांवर प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असून, पुढील तीन दिवसांमध्ये लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्याचे आव्हान राहणार आहे. वेळेत अनुदान वाटप न झाल्यास प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

भोकरदन तालुका सर्वांत मागेलाभार्थ्यांना अनुदान वाटपात भोकरदन तालुका सर्वांत मागे आहे. या तालुक्यातील १५४० लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. जाफराबाद तालुक्यातील ६४१, घनसावंगी तालुक्यातील ३९९ लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. मंठा तालुक्यातील ११०, जालना- ८५, अंबड- १७६, परतूर- ६७, तर बदनापूर तालुक्यातील ४५ लाभार्थीही अनुदानापासून वंचित आहेत.

प्रशासकीय कारवाई होणारस्वच्छ भारत मिशनअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांचे अनुदान वेळेत वाटप करण्याबात सूचना देण्यात आल्या होत्या. वेळेत कार्यवाही न झाल्याने तीन गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी वेळेत अनुदान वाटप न केल्यास प्रशासकीय कारवाई होणार आहे.-वर्षा मीना, सीईओ, जि.प., जालना

शौचालय बांधकाम, अनुदानाची स्थितीतालुका- उद्दिष्ट- बांधकाम- अनुदान- वंचितबदनापूर- १२३९- १२३५- ११९०- ४५परतूर- १६४८- १५५७- १४९०- ६७अंबड- ३४०४- ३१३१- २९५५- १७६जालना- १२१८- ११९८- १११३-८५मंठा- १९४६- १४९०- १३८०- ११०घनसवंगी- ३६१५- ३१५२- २७५३- ३९९जाफराबाद- ३६१५- ३८७४- ३२३३- ६४१भोकरदन- ४९७७- ४०५६- २५१६- १५४०एकूण- २२४८६- १९६९३- १६६३०- ३०६३ 

टॅग्स :JalanaजालनाJalna z pजालना जिल्हा परिषद