शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल तर लोकशाही संपली असं जाहीर करा: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 14:12 IST

केंद्र सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत.

जालना: आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत आहे , पण आता तुमचे मत कधी सुरत, थेथून गुवाहाटी, गोवा दिल्ली असे जात आहे. मत कोणाला दिले तरी खोके पाठवून लोकप्रतिनिधी पळवणार असाल, तर लोकशाही संपली असं जाहीर करा, अशी टोकदार टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठ्न जाणार आहे. ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालणार. अशी लोकशाही आपण मानणार नाही. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ असा लावणार असेल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये होत नाही. 

न्यायपालिकेवर ताबा घेण्याचा प्रयत्न सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत. कायदामंत्री, उपराष्ट्रपती त्यावर बोलताहेत. पण आम्ही बोललो तर अवमानना व्हायला हवेच पण समान कायदा हवा. न्यायमूर्ती पण पंतप्रधान नेमणार असतील तर काय फायदा. पंतप्रधान बोले तो कायदा ही लोकशाही असू  शकत नाही. अशी टीका देखील माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

टॅग्स :JalanaजालनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा