शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विष घेतलेल्या पतीचा मृत्यू; पत्नी चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:51 IST

एका दाम्पत्याने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. पतीचा जागीच मृत्यू असून, त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरातील पोस्ट आॅफिस भागात राहणाऱ्या एका दाम्पत्याने शनिवारी सायंकाळी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू असून, त्याच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.भगवान पुंजाजी मोरे (५५) असे मयताचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील नांजा येथील भगवान मोरे हे भोकरदन शहरातील एका शेतक-याकडे सालगडी म्हणून कामाला होते. शहरातील पोस्ट कार्यालयाच्या बाजूला किरायाने घेतलेल्या एका खोलीत पत्नी लक्ष्मीबाई (४५) यांच्या समवेत ते राहत होते. शनिवारी शहरातील आठवडी बाजार असल्याने भगवान मोरे हे बाजारात गेले होते. ते घरी परतल्यानंतर पत्नी लक्ष्मीबाई यांच्यासमवेत शाब्दिक बाचाबाची झाली. काही काळानंतर त्यांच्यातील भांडण थांबले. मात्र, बराच वेळ झाला तरी घरातून आवाज येत नसल्याने त्यांच्या घराशेजारी राहणा-या एकाने दरवाजा उघडला. त्यावेळी मोरे दाम्पत्य एकमेकांजवळ शांत बसलेले दिसून आले. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचा संशय आल्याने त्या युवकाने इतरांना बोलावून घेतले. नागरिकांनी पाहणी केली असता भगवान मोरे हे मयत झाल्याचे दिसून आले. तर लक्ष्मीबाई या बेशुध्द अवस्थेत दिसून आल्या. नागरिकांनी तात्काळ त्यांना खासगी रिक्षातून ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉ. एस. एस. म्हेत्रे यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे पाठवून दिले.घटनेची माहिती मिळताच बीट जमादार डी.जे. शिंदे, बी.एल.राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, त्या दाम्पत्याने विष कोणत्या कारणाने घेतले, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पार्थिव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.या दाम्पत्यास एक मुलगा, तीन मुली आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार