शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:41 IST

भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील मेहगाव शिवारात एका २० वर्षीय अविवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध/ धावडा : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील मेहगाव शिवारात एका २० वर्षीय अविवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.पारध पोलीस ठाणे हद्दीतील धावडा ते मेहगाव रस्त्या दरम्यान एका नाल्याच्या काठावर सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास काही गुराखी गुरे चारण्यासाठी गेले असता, त्यांना एका तरुणीचा मृतदेह दिसला.त्यांनी ही माहीती तात्काळ पारध पोलीस ठाण्यात दिली. पारध ठाण्याचे सपोनि सुदाम भागवत यांनी भोकरदन चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाय यांना ही माहिती कळविल्या वरून जायभाय हे त्यांच्या पथकातील रामेश्वर शिनकर, गणेश पायघन,सागर देवकर, शेख असेफ, दुर्गेश राठोड, समाधान जगताप आणि पारध पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला.सदर तरुणीच्या मृतदेहाजवळ आधार कार्ड आढळून आले. त्या वरून सदर तरुणीचे नाव छाया समाधान डुकरे असून तिचा पत्ता रा.जांब, ता.जि. बुलडाणा असल्याचे उघड झाले.पंचनामा करून सदर तरुणीचा मृतदेह प्रा.आरोग्य केंद्र वालसावंगी येथे हलविण्यात आला असून रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती पारध पोलिसांनी दिली. सदरची माहीती मयत तरुणीच्या नातेवाईकांनाही देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.सदर तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याने हा खूनच झालेला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सपोनि सुदाम भागवत हे करीत आहेत. या युवतीच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :Deathमृत्यूMurderखूनCrime Newsगुन्हेगारी