शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:51 IST

सोमवारी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध मागण्यांसाठी आशा- गटप्रवर्तकांनी ३ सप्टेंबरपासून कामावर बहिष्कार टाकला आहे. कामावर बहिष्कार टाकणाऱ्या आशांना सीईओ निमा अरोरा यांनी नोटिसा पाठवल्या होत्या. या कारवाईविरोधात सोमवारी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. आंदोलनानंतर सीईओ निमा अरोरा यांनी सदरील कारवाई मागे घेतली.मानधन वाढीचा शासकीय निर्णय सरकारने काढावा, या प्रमुख मागणीसाठी ३ सप्टेंबरपासून आशा वर्कर्सने कामावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आरोग्य विभागाची कामे ठप्प झाली असून, ज्या आशा वर्कर्सनी कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी तात्काळ कामावर रूजू व्हावे, अशा नोटीसा मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी काढल्या होत्या. या कारवाईच्या विरोधात सोमवारी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर व सीईओ निमा अरोरा यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी कारवाई मागे घेतली.यावेळी कामगार नेते अण्णा सावंत, गोविंद आर्दड, कल्पना आर्दड, कुंदा बादल, ज्योती जिने, मिना ठोंबरे आदींची उपस्थिती होती.शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी उपोषणजालना : प्रशासनाने आर. टी. ई. अ‍ॅक्ट २००९ चा भंग करून नियमबाह्य, अनावश्यक व अनधिकृत ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू केले आहे. हे वर्ग तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षकांनी सोमवारपासून जि.प. कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.यावेळी आर. ए. पाटील, एस. एम. आरसूळ, के. आर. बोर्डे, एस. बी. राठोड, एल. बी. जाधव, ए. डी. मुळे, वाय. आर. टेके, एस. ए. आमले, एम. एम. शेळके, एल. आर. कुºहाडे, डी. एच. कोल्हे, एस. एच. पाटील, यु. आर. म्हस्के, सचिन देशमुख, सतीश कुभफळे, एस. के. पटेल होते.रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उपोषणविरेगाव व विरेगाव तांडापर्यंत अपूर्ण रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता अपूर्ण आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहील, अशा इशारा देण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाTeacherशिक्षक