शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धाडस ! अस्वलाच्या हल्ल्यात जखमी असतानाही दहावीच्या विद्यार्थ्याने केला जोरदार प्रतिकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:06 IST

धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. मात्र त्याने धाडस दाखवत अस्वलाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत स्वतः जीव वाचवला.  

जालना : भोकरदन शहरातील धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. मात्र त्याने धाडस दाखवत अस्वलाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत स्वतः जीव वाचवला.  

याबाबत प्रत्यक्षदर्शिंच्या माहिती नुसार, आदिनाथ सपकाळ हा त्याचे वडील व आणखी दोघांसोबत धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे सकाळी शेतात गेला होता. शेतातील त्याचे काम होताच तो दहावीची परीक्षा असल्याने घराकडे निघाला. शेतापासून काही अंतर पार करताच त्यावर अचानक  मागच्या बाजूने अस्वलाने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आदिनाथ खाली पडला तेव्हा अस्वलाने त्याच्या मांडीचा चावा घेतला. त्यानंतर अस्वलाने आदिनाथच्या गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्यातून स्वतःस  सावरत आदिनाथने मदतीसाठी आवाज देत आजूबाजूचे काही हातात लागते का ते चाचपडून पाहिले. यातच त्याच्या हाताला एक दगड लागला, त्याने पूर्ण शक्ती एकवटून त्या दगडाने अस्वलाच्या तोंडावर हल्ला चढवला. दगडाच्या फटक्याने अस्वल काही काळासाठी बाजूला झाले,तेव्हा आदिनाथचा आवाज ऐकून मागून धावत आलेल्या गणेश सपकाळ याने अस्वलाला काठीने मारत तेथून हुसकवून लावले. यानंतर आदिनाथवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आदिनाथच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अस्वलाचा आणखी दोघांवर हल्ला धनगरवाडी येथून हुसकवून लावलेल्या अस्वलास पकडण्यासाठी गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा ते आयटीआय कॉलेज कडून जोमाळा शिवारातून फत्तेपूर येथे पोहचले. येथे सुद्धा अस्वलाने रुख्मनबाई तळेकर व शिवम गायकवाड यांचावर हल्ला करून जखमी केले. यात गंभीर जखमी असलेल्या शिवमला अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणच्या हल्ल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाचे एक पथक या अस्वलाला पकडण्याच्या प्रयत्नात आहे. 

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीStudentविद्यार्थीexamपरीक्षा