शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसोबत धोका! बोगस बियाणांने गोदामच भरले;शेकडो क्विंटल बियाणे विक्री झाल्याचा अंदाज

By महेश गायकवाड  | Updated: June 10, 2023 17:58 IST

केदारखेडा-भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक असलेल्या गोदामात बोगस बियाणांची पॅकिंग करण्याचा गोरखधंदा दोन महिन्यांपासून सुरू होता.

केदारखेडा (ता.भोकरदन): नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये बाजारातील सोयाबीन भरून बाजारात विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी भोकरदन तालुक्यात उघडकीस आला. कृषी विभागाच्या कारवाईमुळे बाजारात जाणारे शेकडो क्विंटल बोगस बियाणे पकडण्यात आले; परंतु या कारवाईपूर्वी या गोदामातून शेकडो क्विंटल बोगस बियाणे बाजारात गेल्याचा अंदाज आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.  

केदारखेडा-भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीनजीक असलेल्या गोदामात बोगस बियाणांची पॅकिंग करण्याचा गोरखधंदा दोन महिन्यांपासून सुरू होता. पूर्णा-केळना शेतकरी प्रोड्यूसर कंपनीने हे गोदाम भाडेतत्त्वावर घेतल्याचे समजते. या गोदामात बाजारातून आणलेले बियाणे कोणतीही प्रक्रिया न करता नामांकित कंपन्यांच्या बॅगेत भरण्यात येत होते. महाराष्ट्रात विक्री परवानगी नसलेल्या तेलगंणा येथील लोकप्रिया सीड्स, तसेच औरंगाबाद येथील बायडेन ॲग्रोटेक कंपन्यांच्या बॅगेत हे बियाणे भरण्यात येत होते. या गोदामात फुले संगम वाणाच्या बँगेत २५ किलोच्या वजनाच्या २१३ तर बायडन कंपनीच्या ११९ बॅगामध्येही सोयाबीन बियाणे भरल्याचे आढळून आले. त्यावर लाॅट नंबर, उत्पादन तारीख नव्हती, तसेच ५२ किलो वजनाचे ३५० सोयाबीन बियाणाचे पोते साठवण्यात आले होते. दरम्यान या गोदामातून शेकडो क्विंटल बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हे बियाणे काेणत्या जिल्ह्यात नेण्यात आले. त्याचा शोध लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे.  बोगस बियाणे करणारे कोण ?कृषी विभागाने अंदाजे छापा टाकलेल्या गोदामातून २६३ क्विंटल बियाणे जप्त केले आहे. रात्री उशीरापर्यंतचा कृषी विभागाने पंचनामा केला. परंतु, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या रॅकेटमध्ये मोठे लाेक सहभागी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोषींवर कठोर कारवाई लोकप्रिया सीड्स कंपनीच्या उत्पादित सोयाबीन बियाणाची विक्री करण्याची परवानगी महाराष्ट्रात नाही. यासंदर्भात सविस्तर अहवाल दोन दिवसांत कृषी आयुक्तालयाकडून आम्हाला प्राप्त होणार आहे. संबधित शेतकी कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी