शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

परतूर दरोड्याचे मुंबईत धागेदोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:22 AM

परतूर येथील नवा मोंढा भागातील अलंकार ज्वेलर्समध्ये भरदिवसा अग्निशस्त्रासह दरोडा टोकणाऱ्या छोटा राजनच्या डीकेराव टोळीतील तिघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतूर येथील नवा मोंढा भागातील अलंकार ज्वेलर्समध्ये भरदिवसा अग्निशस्त्रासह दरोडा टोकणाऱ्या छोटा राजनच्या डीकेराव टोळीतील तिघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली. यातील मनोज भार्गव ईजवा ऊर्फ जिवा याने दहा वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतरही मुंबईसह राज्यात ७ ते ८ दरोडे टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.२३ मे रोजी परतूर येथील नवा मोंढा भागातील अलंकार ज्वेलर्समध्ये भरदिवसा अज्ञात दरोडेखाऱ्यांनी स शस्त्र दरोडा टाकला होता. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन गुन्हयाची पध्दत लक्षात घेऊन तसेच सखोल विचारपूस करुन आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली. त्यानंतर आरोपींचे रेकॉर्ड हस्तगत करुन आरोपीतांची माहिती काढली.सदरील गुन्ह्यातील आरोपी हे मुंबई येथे राहत असल्याची माहिती पोनि. गौर यांना मिळाली. या माहितीवरुन पोनि. गौर हे त्यांच्या पथकांसह मुंबई येथे गेले. त्यानंतर त्यांनी चेंबूर व मुंबई येथील शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची मदत घेऊन गुन्ह्यातील आरोपी महेंद्र सभापती मिश्रा यास ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने टोळी प्रमुख मनोज भार्गव ईजवा उर्फ जिवा तसेच लोकेश शिना शेट्टी व इतर साथीदारसह गुन्हा केल्याची कबूली दिली. यावरुन गुन्हे शाखा कक्ष-२ नवी मुंबई यांच्या मदतीने सापळा लावून वरील दोन्ही आरोपीतांना अटक केली.नाशिकचे पथक जालन्यातनाशिक येथील मुथूट फायनान्समध्ये भरदिवसा दरोडेखोरांनी शुक्रवारी दरोडा टाकत गोळीबारा केला होता. दरम्यान, या दरोडेखोरांची व जालना पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची दरोडा टाकण्याची पध्दत एकच असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी अटकेतील आरोपींची चौकशी करण्यासाठी नाशिक येथील एक पथक शुक्रवारी मध्यरात्री जालना येथे आले होते.मनोज भार्गव ईजवा हा या टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यावर मुंबई, सांगलीसह २२ गुन्हे दाखल आहे. १९९७ साली माटुंगा येथे त्याने अग्निशस्त्र दरोडा टाकला होता. येथे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे. १९९८ साली माटुंगा येथे १, २००३ साली बोरीवली व विर्लेपाले येथे १ व २००४ साली सांगली येथील कोथरुड येथे १ दरोडा टाकला होता. याच गुन्ह्यात त्याला दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो २०१२ ला बाहेर आला. यावर्षीच त्याने गुजरात येथील सिलवासा येथेही दरोडा टाकला होता. त्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. दरम्यान, मुंबई पोलीस तीन वर्षांपासून त्याचा शोध घेत होते.

टॅग्स :DacoityदरोडाArrestअटकCrime Newsगुन्हेगारी