शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांची ऑनलाईन फसवणूक, सायबर पोलिसांमुळे २४ तासांत मिळाली रक्कम परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:43 IST

खात्यातील ८० हजार रूपये ठगांनी लांबिवले, तत्काळ तक्रार केल्याने मिळाले पैसे परत

जालना : अंबड नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा नगर विकास यंत्रणेतील प्रभारी प्रकल्प संचालक विक्रम मांडुरके यांच्याच बँक खात्यातील ८० हजार रूपये महाठगांनी रविवारी लांबविले होते. मांडुरके यांनी फसवणुकीची तक्रार देताच सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करीत २४ तासात ती रक्कम मांडुरके यांच्या खात्यात परत वळविण्यात यश मिळविले.

अंबड नगर पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके (रा. जालना) यांच्या एचडीएफसी बँक खात्यातील ८० हजार ५६ रुपये रविवारी २९ जानेवारी रोजी महाठगांनी ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. खात्यावरील पैसे ट्रान्स्फर झाल्याचे समजताच विक्रम मांडुरके यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधून फसवणुकीची तक्रार दिली. मांडुरके यांची तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून विविध पोर्टलद्वारे माहिती संकलित केली.

संकलित केलेल्या माहितीनुसार पैसे वळविण्यात आलेल्या वॉलेट व बँकेला संबंधित रक्कम फ्रीज करण्याचे सूचित केले. सातत्याने या प्रक्रियेचा पाठपुरावा केल्याने मांडुरके यांच्या खात्यात ८० हजार ५६ रुपये २४ तासाच्या आत परत जमा झाले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपाधीक्षक इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोनि. मारुती खेडकर, अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Jalanaजालनाcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी