शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

जालन्यात क्रूरतेचा कळस! जुन्या वादातून आई-वडिलांसमोरच २५ वर्षीय मुलाची रॉडने ठेचून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:18 IST

या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालना: शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीने आता टोक गाठले आहे. जुन्या वादातून टवाळखोर तरुणांनी २५ वर्षीय विकास लोंढे याची लाठ्याकाट्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत विकास लोंढे (वय २५, रा. नूतन वसाहत) हा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोंढे यांचा मुलगा. तो शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ ते १२:३० वाजेच्या दरम्यान एका नातेवाईकाच्या लग्न समारंभातून घरी परतत होता. घरापासून अवघ्या काही अंतरावर असतानाच काही टवाळखोर तरुणांनी त्याला अडवले.

आई-वडिलांसमोरच मुलावर हल्लाजुना वाद उकरून काढून टवाळखोरांनी विकासला अमानुष मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून विकासचे आई-वडील आणि आसपासचे नागरिक भांडण सोडवण्यासाठी धावले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. टवाळखोरांनी विकासच्या डोक्याला आणि पायाला लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली होती. आपला मुलगा या गुंडांनी ठार मारला, हे कळताच विकासच्या आईने मध्यरात्रीच टाहो फोडला. ही हृदयद्रावक घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

उपचारादरम्यान मृत्यूनागरिक जमा होत असल्याचे पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या विकासला तात्काळ जालना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यानच विकास लोंढे याचा मृत्यू झाला.

टवाळखोरांवर कठोर कारवाईची मागणीमृत्यू होण्यापूर्वी विकासने एका मित्राला मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे सांगितली. त्याचा हा जबाब एका मित्राने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. मयत विकास लोंढे यांचे वडील प्रकाश लोंढे आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित टवाळखोर गुंड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी सकाळी घटनास्थळी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक टीमनेही तपासणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Young man murdered in front of parents over old feud.

Web Summary : In Jalna, a 25-year-old man was brutally murdered with iron rods following an old dispute. The shocking incident occurred in front of his parents, sparking outrage. Police are investigating, with demands for strict action against the culprits.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना