लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:49 AM2021-05-05T04:49:06+5:302021-05-05T04:49:06+5:30

जिल्ह्यात एकूण २०२ लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे नियोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ १०२ केंद्रावरच लसीकरण केले गेले. त्यातही ...

Crossing the two lakh stage of vaccination | लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

Next

जिल्ह्यात एकूण २०२ लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे नियोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ १०२ केंद्रावरच लसीकरण केले गेले. त्यातही गेल्या महिन्याभरापासून लसीकरणाचा बोजरवा केवळ लस उपलब्ध होत नसल्याने उडाल्याचे दिसून येत आहे. ही लस लवकर मिळावी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, यांनी देखील वरिष्ठांशी संपर्क करून तातडीने पुरवठा करण्याची मागणी केली. तसेच याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील सतत लस मिळण्यासाठी केंद्रातील मंत्री तसेच अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. परंतु लसच उपलब्ध नसल्याचे कारण देत हा पुरवठा ठप्प झाल्याचे सांगण्यात आले.

चौकट

ज्येष्ठांची परवड थांबेना

जालना जिल्ह्यातील लसीकरण पुरेसी लस मिळत नसल्याने कोलमडले आहे. त्याचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. अनेकवेळा लस आली असेल या आशेवर नागरिक जवळच्या लसीकरण केंद्रावर जात आहेत. परंतु लस नसल्याचे सांगितल्यावर त्यांचा हिरमोड होऊन परत फिरावे लागत आहे.

Web Title: Crossing the two lakh stage of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.