शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

खरीप उत्पादन ५० टक्क्यांवर घसरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:56 AM

गेल्या तीन महिन्यात सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून, गेल्या २६ दिवसांपसून पावसाने हजेरी न लावल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीची वाढ खुंटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून, गेल्या २६ दिवसांपसून पावसाने हजेरी न लावल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीची वाढ खुंटली आहे. कोरवाडहू शेतकऱ्यांनी तर आता चांगल्या उत्पादनाच्या आशा सोडल्या आहेत. पाणीसाठ्याची स्थिती गंभीर असून, जिल्हाभरात पावसाळ््यातही १९ टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मध्यम लघु प्रकल्पही कोरडेठाक असल्याने जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन महिन्याचा कालावधी झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पीक करपू लागले आहेत. त्यातूनही तग धरुन उभ्या असलेल्या सोयाबीनमध्ये पाण्याअभावी दाणे भरण्यास अडचण येणार आहे. उडीद, मुगाच्या उत्पादनावर ३० टक्के घट होण्यात शक्यता आहे. जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६६० हेक्टरवरील सोयाबीन व ३ लाख २ हजार ६५५ हेक्टरवरील कपाशी धोक्यात आली आहे. तसेच येणा-या काळात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुकत चाललेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी एका निवेदना,ारे केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे.भर पावसाळ््यात १९ टॅकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात यावर्षी एक पाऊस सोडला तर अद्यापही मोठ्या पाऊस झाला नाही. परिणामी, भर पावसाळ््यात १९ टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १६ टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात पाऊस न झाल्यास या टॅकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ११ गावे व २ वाड्यांमध्ये १६ टॅकर, परतूर तालुक्यातील १ गावामध्ये १ टॅकर, जाफराबाद तालुक्यातील १ गावात २ टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात भोकरदनमध्ये ३२ व जाफराबादमध्ये ११ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.प्रकल्पांनी गाठला तळजालना जिल्ह्यात ७ मध्यम प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी या प्रकल्पांमध्ये ४२.८५ टक्के उपयुक्त पाणीसाठी होता. तो यंदा केवळ ८.८३ टक्के आहे. सात पैंकी दोन प्रकल्प जोत्याच्या पातळी खाली असून, ० ते २५ टक्के पाणीसाठा असलेले तीन प्रकल्प आहेत. तर २६ ते ५० टक्के यामध्ये केवळ एका प्रकल्पाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५७ लघु प्रकल्प असून, त्यामध्ये गेल्या वर्षी २०.१० टक्के पाणीसाठा होता. तो यंदा केवळ ४.७९ टक्के आहे. यावरुन दुष्काळाची परिस्थिती किती भायवह आहे हे स्पष्ट होते. ५७ लुघ प्रकल्पापैंकी ४४ प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहेत.जिल्ह्य१०० मि.मी ने पाऊस कमीजालना जिल्ह्यात सरसरी १७ सप्टेंबरपर्यंत अपेक्षित पाऊस हा ४९० मि.मी. होता. परंतु, आज घडीला ४७१.६० मि. मी. पाऊस पडला आहे. जो की, आजच्या सरासरीच्या तुलनेत १०० मि. मी. कमी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या २४ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली नसल्याची नोंद आहे.प्िििपकांचे पंचनामे करण्याची शेतकºयांची मागणीचंदनझिरा : जालना तालुक्यातील कारला, ममदाबाद, भुतेगाव, हातवन, वडीवाडी इ. भागांतील सोयाबीन, मका, तूर व कपाशीच्या पिकांनी माना टाकल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने पिके करपू लागली आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी राजू खरात, लक्ष्मण देशमुख, दत्तात्रय गोरे, प्रकाश भवर, कल्याण खरात, बबन जाधव, भाऊसाहेब खरात, कुंडलिक सरोदे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018agricultureशेती