शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात दिंडी मार्गाचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:38 IST

महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे परतूर ते माजलगाव दरम्यान  शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८  चे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

आष्टी (जि.जालना) : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतवाडी शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात चार शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

 परतूर ते माजलगाव दरम्यान  शेगाव-पंढरपूर या राज्य महामार्ग ५४८  चे काम सुरू आहे. हे काम हैदराबाद येथील कंपनीस शासनाने  दिले आहे.  यासाठी परतवाडी शिवारात रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गात जाणाऱ्या मोबदल्यासाठी सदर काम स्थानिक शेतकरी बंद पाडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवार सकाळी ११ च्या  सुमारास अभियंता अतुल अरूण कोटेचा कर्मचारी व पोलिसांसोबत परतवाडी शिवारात रस्ते कामाची पाहणी करत असताना, परतवाडी येथील सोनाजी आढे, नारायण मोती आढे, पांडुरंग सोपा आढे, वसुरुमगाव येथील आप्पा लहाने हे तिथे आले. मुरुम टाकत असलेली शेती आमची असून त्याचा कुठलाही मोबदला शासनाकडून मिळालेला नाही. काम बंद न केल्यास स्वत:ला जाळून घेवू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. त्यामुळे अभियंता कोटेचा यांच्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे तीव्र संताप  व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाFarmerशेतकरीhighwayमहामार्गGovernmentसरकार