शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे संपूर्ण गाव सील; संपर्कातील ४९ नागरिक क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 6:47 PM

खोकला, तापीचा त्रास होऊ लागल्याने शेलवडा (ता.परतूर) येथील महिलेवर ६ ते १० एप्रिल या कालावधीत परतूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते.

ठळक मुद्देसंपर्कातील १७ जण जिल्हा रूग्णालयात संपूर्ण गाव केले सील, ८० कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू

जालना/ परतूर : परतूर तालुक्यातील शेलवडा येथील एक ३९ वर्षीय महिला मंगळवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर प्रशासनाने बुधवारी शेलवडा गाव पूर्णत: सील केले. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांपैकी १७ जणांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या पथकामार्फत शेलवडा येथील ८० कुटुंबातील ५६० जणांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे.खोकला, तापीचा त्रास होऊ लागल्याने शेलवडा (ता.परतूर) येथील महिलेवर ६ ते १० एप्रिल या कालावधीत परतूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने १० एप्रिल रोजी त्या महिलेला जालना येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथून नंतर १३ एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तातडीने त्या महिलेची कोरोना तपासणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले. मात्र, १४ एप्रिल रोजी महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर दुसºया वेळेस २० एप्रिल रोजी पुन्हा स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, त्या महिलेचा दुसरा अहवाल २१ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आणि सर्वांचेच धाबे दणाणले.

त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. त्या महिलेच्या संपर्कात ४९ नगारिक आले असून, ८ जण अधिक रिस्कचे तर इतर ४१ जण कमी रिस्कचे आहेत. त्यातील १२ जणांना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतरांना आणण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रशासनाने बुधवारी तातडीने कार्यवाही करीत शेलवडा गाव सील केले आहे. तर आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील ८० कुटुंबातील ५६० जणांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. या पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनिसांचा समावेश आहे. 

जालन्यातील महिलेची प्रकृती गंभीरजालना शहरातील दु:खीनगर भागातील कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, तिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पाचवा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला असून, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. 

न्युमोनिया, क्षयग्रस्तांची प्रकृती चिंताजनकजिल्हा शासकीय रूग्णालयात जालना शहरातील न्युमोनियाग्रस्त ५५ वर्षीय महिला, वाटूर (ता.परतूर) येथील न्युमोनियाग्रस्त ३४ वर्षीय पुरूष, परतूर येथील न्युमोनियाग्रस्त ७५ वर्षीय व्यक्ती तर अंबड येथील क्षयरोगग्रस्त ६० वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. संबंधितांची कोरोना तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, संबंधितांची प्रकृती गंभीर असल्याचे रूग्णालय प्रशासनाने सांगितले.

५३२ अहवाल निगेटिव्हजालना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत ८०५ कोरोना संशयित आढळून आले आहेत. कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर ५३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असून, उपचारानंतर ४१५ जणांना रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना