शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजारात आवक वाढूनही तूर, मक्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:31 IST

बाजारगप्पा : बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे

- संजय देशमुख ( जालना )

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे, मात्र आवक वाढताच दरामध्ये अनुक्रमे २०० आणि १०० रुपयांची घसरण झाली आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असली तरी या तिन्हींचे दर स्थिर आहेत. 

जालना जिल्ह्यात कापसाचे दर कोसळले असून, हमी भावपेक्षा ५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. मकर संक्रंतीनिमित्त बाजारात गुळाची आवक बऱ्यापैकी असली तरी भाव हे गेल्यावर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारपेठेत बाजरी २०० पोती, ज्वारी ३०० पोती, नवीन तूर २००० हजार पोती आणि मकादेखील २००० पोती आवक आहे. मक्याचे भाव हे १५०० ते १६०० रुपये असून, यात शंभर रुपयांची घसरण झाली आहे.

ज्वारीच्या भावातही २०० रुपयांची घसरण असून, तुरीचे दरही सरासरी २०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बाजारातून तेजीची आशा करणे आता अवघड झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तूरडाळ, चनाडाळची आवक बऱ्यापैकी असली तरी यातही सरासरी शंभर ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे. 

बाजारपेठेत सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, हमीभाव ५ हजार ४०० रुपये आहे. मात्र, हा भाव उच्च दर्जाच्या कापसाला देण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस दर्जेदार नसल्याचे सांगून त्यांना कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, शेतकऱ्यांकडून कमी भावाने कापूस खरेदी केली जात आहे. ग्रामीण भागात परिस्थितीमुळे मेटाकुटीला येत शेतकरी कमी किंमतीत पशुधन विक्री करीत आहेत.

सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात २८ दिवसांत केवळ ३ हजार ५०० क्विंटल एवढा कमी कापूस खरेदी झाला आहे. या केंद्रावर कापूस खरेदी करताना त्यात प्रारंभी किती ओलावा आहे, हे मोश्चर मशीनद्वारे तपासून घेतला जात आहे. त्यात ८ ते १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्यास तो कापूस खरेदी केला जातो. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसात या टक्केवारीपेक्षा कितीतरी पट अधिक ओलावा दिसून येत असल्याने कापूस परत करण्याची वेळ केंद्रावर येत असल्याचे  दिसून येते.

सोयाबीनची आवक आता मंदावली असून, ती केवळ ५०० पोती येत आहे. याला ३ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. साखरेचा कोटा गेल्या महिन्यांच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी केला असून, साखरेचे दर स्थिर आहेत. यंदा जानेवारी महिन्यासाठी केंद्र सरकारने १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे. 

जालन्यातील बाजारपेठेत गुळाची आवक चांगली असली, तरी भाव पाहिजे तसे नसल्याचे गूळ असोसिएशनचे सचिव गोविंद सराटे यांनी सांगितले. संक्रांत अद्याप पंधरा दिवस दूर असली तरी तिळाचे भाव हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले असून, किरकोळ बाजारपेठेत १८० रुपये किलोने विक्री होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी